नांदेड| कै. वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालय देगलूर नाका नांदेड राष्ट्रीय सेवा योजना विशेष युवक शिबिर अंतर्गत मोफत नेत्र तपासणी आणि रक्तगट तपासणी शिबिर घेण्यात आले.
रक्तगट तपासणीसाठी कुरेशी मोहम्मद काझिन, फरहान खान सय्यद अक्रम, शेख समीर यांनी कार्य केले त्यांनी मुजामपेठ येथील 92 लोकांचे रक्त तपासून रक्त गटाचे निदान केले त्याचबरोबर नेत्र तपासणी साठी विजय चालिकवार,सुफियान खान यांनी कार्य केले त्यांनी 63 रुग्णांचे नेत्र तपासून दिले.
हा नेत्रतपासणी व रक्तगट तपासणी कार्यक्रम पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन व स्वच्छ भारत अभियान विशेष युवक शिबिर राष्ट्रीय सेवा योजना विभागांमार्फत आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उस्मान गणी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. बाबासाहेब भुक्तरे, प्रा. निजाम सर,प्रा.मो.दानिश, प्रा.हिना कुरेशी,प्रा. समीना मॅडम, अक्षय हासेवाड, राष्ट्रीय सेवा योजना प्रतिनिधी कुरेशी मोहम्मद दाईम आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरार्थी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.