नवीन नांदेड| नांदेड जिल्हयातील अग्रगण्य क्रमात गणली जाणारी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था,विष्णूपूरी नांदेड ची २०वी सर्व साधारण वार्षिक सभा शनिवारी ता.२६ मार्च रोजी विद्यापीठाच्या अधिसभागृह येथे पतसंस्थेचे अध्यक्ष संजयसिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी माजी अध्यक्ष शिवराम लुटे यांच्यी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सभेच्या सुरुवातीस अध्यक्ष संजयसिंह ठाकूर यांनी मनोगत व्यक्त करताना अर्थव्यवस्थेतील चढउतार,नोटबंदी अशी अनेक आर्थिक आव्हाने समोर असतानाही ही संस्था सहकार क्षेत्रात भक्कमपणे पाय रोवून उभी आहे असे सांगत पतसंस्था स्वभांडवलावर यैण्यासाठी, सभासदांना विविध सोयी-सुविधा व संस्थेची प्रगती कशी करता येईल याबाबत मार्गदर्शन केले.
सभेत पतसंस्थेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक शिवराम लुटे यांची नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल सर्व सभासदांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी श्री.लुटे म्हणाले हा सत्कार माझा नसून माझ्या ला निवडून आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्याचा आहे. असे म्हणत त्यांनी पतसंस्थेचे अध्यक्ष संजयसिंह ठाकूर, संचालक तसेच सर्व सभासदांचे आभार मानले.
सभेस पतसंस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र शेंबोले,सचिव उध्दव हंबर्डे,संचालक महेश त्रिभूवन,डॉ.वैजयंता पाटील, सौ.वसुधा कोटगीरे,अनिल कळसकर, अब्दुल बशीर तसेच डॉ. गोविंद कतलाकुटे,डॉ. अशोक कदम, डॉ.हुशार सिंग साबळे,माजी अध्यक्ष शिवाजी हंबर्डे, काळबा हनवते,शिवाजी कल्याणकर,प्रमोद हंबर्डे,केशव कल्याणकर, राजेश नाईक,शिवाजी हंबर्डे,हरीश पाटील, अनिल सोनकांबळे,शंकर हंबर्डे,प्रदिप बिल्डा, शिवाजी चांदणे,संतोष हंबर्डे व सभासद उपस्थित होते.