नांदेड| दक्षिण पूर्व मध्य रेल्वे ने कळविल्या नुसार रेल्वे लाईनचे देखरेख (मेंटेनन्स) कार्य पूर्ण करण्याकरिता लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे काही रेल्वे गाड्यांच्या परीचालनावर परिणाम झाला आहे. नांदेड रेल्वे विभागातुन धावणारी नांदेड-संत्रागच्ची–नांदेड एक्स्प्रेस च्या पाच फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, त्या पुढील प्रमाणे -
1. दिनांक 4, 11, 18, 25 एप्रिल आणि 02 मे, 2022 रोजी (सोमवारी) हुजूर साहिब नांदेड येथून सुटणारी गाडी संख्या 12767 हुजूर साहिब नांदेड ते संत्रागच्ची एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. 2. दिनांक 6, 13 20, 27 एप्रिल आणि 04 मे, 2022 रोजी (बुधवारी) संत्रागच्ची येथून सुटणारी गाडी संख्या 12768 संत्रागच्ची ते हुजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.