साईबाबा मंदिर धनगरवाडी कलशारोहण वर्धापन दिनानिमित्त भव्य कीर्तन महोत्सव साजरा
नांदेड| सामाजिक आणि धार्मिक परिवर्तनात गेल्या अनेक दशकापासून योगदान देणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील 107 साधूसंतांचा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज गौरव केला. धनगरवाडी येथील साईबाबा मंदिर कलशारोहण चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य कीर्तन महोत्सव सोहळ्यात खासदार चिखलीकर यांनी साधुसंतांचा गौरव करून त्यांच्या विचारांना अभिवादन केले.
नांदेड जिल्ह्यातील साईभक्तांना साई दर्शनासाठी नांदेड जिल्ह्यातच सुविधा उपलब्ध व्हावी या अनुषंगाने श्री साईबाबा मंदिर शिर्डी च्या धर्तीवर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संकल्पनेतून नांदेड लातूर रोड वरील धनगरवाडी येथे उभारण्यात आलेल्या श्री साईबाबा मंदिर कलशारोहणच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी सात वाजता महाभिषेक आणि मंत्रजागर करून महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सकाळी 11 वाजता श्री संत तुकाराम महाराज गाथा मंदिर श्री क्षेत्र देहू तालुका हवेली चे अध्यक्ष हरिभक्त पारायण परमपूज्य श्री गुरु पांडुरंग महाराज घुले यांच्या जाहीर कीर्तन झाले .
याचवेळी सामाजिक आणि धार्मिक कार्यात गेल्या अनेक दशकापासून योगदान देणाऱ्या साधुसंतांचा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला. नांदेडसह बीड ,उस्मानाबाद ,सोलापूर जिल्ह्यातीलहीअनेक साधुसंत यांना यावेळी गौरवाने सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले की ,आपली संस्कृती टिकविण्यासाठी साधुसंतांचे योगदान अतुलनीय असे आहे . साधू संतांची शिकवण मानवी जीवनाला खऱ्या अर्थाने आकार देते. मानवी जीवनाला सुखप्राप्तीसाठी साधू संतांची शिकवण महत्त्वाची आहे असेही ते यावेळी म्हणाले. प्रत्येक माणसाने धर्माचरण करत असताना साधू-संतांनी सांगितलेल्या मानवी मूल्याचा अंगीकार करावा, त्यातून स्वतःचे आणि इतरांचे जीवन सुखी करता येईल असेही खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यावेळी म्हणाले. कीर्तन महोत्सव नंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. नांदेडसह अनेक भागातील भाविक भक्तांनी कीर्तन सोहळ्याचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमास खा.प्रतापराव पाटील चिखलीकर , सौ.प्रतिभाताई पाटील चिखलीकर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री संजय कौडगे, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले,आ. राम पाटील रातोळीकर आमदार तुषार राठोड, उपजिल्हाधिकारी पंकजराव देवरे, भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्य संतुकराव हंबर्डे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दिलीप कंदकुर्ते, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश निमंत्रित सदस्य राजेश देशमुख कुंटूरकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार, प्रदेश कार्यकारणी सदस्य माणिकराव मुकदम, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्या सौ.संध्याताई राठोड, प्रदेश युवा मोर्चा सचिव अनिल पाटील बोरगावकर, भारतीय जनता पार्टीचे दिव्यांग आघाडीचे रामदास पाटील सुमठानकर, देविदास राठोड धरमसिंग राठोड,
सुधाकरराव भोयर, सुमित राठोड, धर्मराज देशमुख, जिल्हा परिषद सदस्य संतोष राठोड, जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड, शिवराज पाटील होटाळकर, माधवराव उच्चेकर, श्रावण पाटील भिलवंडे, सुहास पाटील डोंगरगावकर, एडवोकेट संदीप पाटील चिखलीकर, सचिन पाटील चिखलीकर, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा जि.प.सदस्या सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर, प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा जि.प.सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, नगरसेवक राजू गोरे, भाजपा तालुकाध्यक्ष शंकर मुतकलवाड, भगवानराव राठोड, माजी जि.प.सदस्य गणेशराव पाटील सावळे, माजी जि.प.सदस्य प्रफुल राठोड, जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटील खानापूरकर, रवींद्र पोतगंटीवार मोगला गौड, अशोक पाटील मुगावकर, केरबा पाटील कापशीकर,
रोहित पाटील, मधुकरराव डांगे, पंचायत समितीचे उपसभापती नरेंद्र गायकवाड, बालाजी पाटील कासारखेडेकर पावडेवाडीचे माजी सरपंच बंडू पावडे, विजय गंभीरे, अनिलसिंह हजारी, श्रीनिवास नरवाडे, शिवराज पाटील मालेगावकर, पत्रकार प्रल्हादराव उमाटे, जनार्दन गुपीले, संजय अंभोरे, गुरुप्रीतसिंघ सोखी, गुरमीतसिंघ महाजन, माजी नगरसेविका सौ.श्रद्धा चव्हाण, नगरसेवक दत्ता वाले, केशवराव मुकदम, लक्ष्मणराव बोडके, पंचायत समिती सदस्य गणेश पाटील उबाळे, माजी नगरसेवक कृष्णा पापीनवार, खुशाल पाटील जाधव, शितल खांडील, राज यादव, बाबूराव केंद्रे बालाजी पाटील मारतळेकर, बळीराम पाटील कदम, बालाजीराव झुंबाड, वीरभद्र राजुरे, गंगाप्रसाद यन्नावार, निलेश गौर, यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती.