नांदेड| महानगर पालिकेने शहरातील अनेक रस्त्यांची कामे काढली आहेत त्यात डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण आहे. प्रभाग १७ अंतर्गत कलामंदिर येथील योगी न्यूज पेपर एजन्सी ते विश्व हॉस्पिटल सोमेश कॉलनी या रस्त्याचे डांबरीकरण होणार आहे. परंतु सदरील भागातील रहिवासी अजित पाठक शहर उपाध्यक्ष मनसे यांनी मागणी केली कि, डांबरीकरण करण्यापूर्वी जाणीवपूर्वक बुजवलेल्या नाल्या परत सुरू करून ड्रेनिजची कामे करावी.
त्यानंतरच डांबरीकरण करावे अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे. नाली आणि ड्रेनिजचे सांडपाणी अनेक वेळा रस्त्यावरून वाहत असते अश्या परिस्थितीत डांबरीकरण केले असता परत रस्ता उखडून नाली आणि ड्रेनिजची कामे करावी लागतील यामध्ये जनतेच्या पैश्याचा अपव्यय होऊन जनतेला परत त्रासच सहन करावा लागेल. त्यामुळे डांबरीकरण करण्यापूर्वी सोमेश कॉलनीतील बुजवण्यात आलेल्या नाल्या सुरू करूनच रस्ता करण्यात यावा.