नविन नांदेड| संविधान हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते भि. ना. गायकवाड यांच्या वतीने सिडको येथिल छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सिडको येथील पेपर स्टॉल लगत मोकळ्या जागी जेष्ठ नागरिक, पत्रकार, व पादचारी लोकांना उन्हात त्रास होऊ नये व बसून थोडा विसावा घेता यावा यासाठी चार खुर्च्या पत्रकार बांधवांना भेट देण्यात आल्या.
यावेळी जेष्ठ पत्रकार रमेश ठाकूर, तिरुपती पाटिल घोगरे, शशिकांत हाटकर यांचा सह सिडको ब्लॉक काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष देवीदास कदम, किशनराव रावणगावकर, प्रा. अशोक मगरे यांच्या सह जेष्ठ नागरिक यांच्यी उपस्थिती होती.