नांदेड| महाराष्ट्र शासन सांस्कृतीक कार्य संचालनालय आयोजीत १८ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा नांदेड केंद्रावर २४ मार्च पासून प्रारंभ होणार आहे.
२४ मार्च ते २५ मार्च या कालावधीत कुसुम सभागृह येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळात संपन्न होणार आहे. या स्पर्धेत एकूण १० बालनाट्य सादर होणार असून. त्यात २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नांदेडच्या वतीने नाथा चितळे लिखित, दिग्दर्शित "मी चोरी केली", दुपारी १२:३० वाजता रामरावजी लोहट पब्लिक स्कुल, परभणीच्या वतीने त्र्यंबक वडसकर लिखित, तूळशीराम हनवते दिग्दर्शित "ध्येयाची पूजा", दुपारी २ वाजता जिजाऊ ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालय,
परभणीच्या वतीने त्र्यंबक वडसकर लिखित, राजू वाघ दिग्दर्शित "मुखवटे", दुपारी ३:३० वाजता क्रांती हुतात्मा चॅरिटेबल ट्रस्ट, परभणीच्या वतीने धनंजय सरदेशपांडे लिखित, मनीषा उमरीकर दिग्दर्शित "बुद्धाची गोष्ट", सायंकाळी ५ वाजता नृसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, परभणीच्या वतीने त्र्यंबक वडसकर लिखित, दिग्दर्शित "जगण्याचा खो" या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. तर शुक्रवार दिनांक २५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता प्रियदर्शनी मेमोरियल ट्रस्ट, नांदेड च्या वतीने नाथा चितळे लिखित,
अमोल गादेकर दिग्दर्शित "हॅलो मी देवबाप्पा बोलतोय" दुपारी १२:३० वाजता नवरत्न रामराव मेमोरियल एज्युकेशन सोसायटी, नांदेडच्या वतीने महेश घुंगरे लिखित, दिग्दर्शित "शाळा", दुपारी २ वाजता राजीव गांधी युवा फोरम, परभणीच्या वतीने धनंजय सरदेशपांडे लिखित, रवी पुरानी दिग्दर्शित "मदर्स डे", दुपारी ३:३० वाजता बालगंधर्व सांस्कृतिक कला, क्रीडा व युवक मंडळ, परभणी च्या वतीने धनंजय सरदेशपांडे लिखित, रवी पाठक दिग्दर्शित "गिव्ह मी सनशाईन" आणि सायंकाळी ५ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हंगरगा च्या वतीने मीरा शेंडगे लिखित, गुलाबराव पावडे दिग्दर्शित "तेलेजू" या नाट्य प्रयोगांचे सादरीकरण होणार आहे. तरी जास्तीत जास्त नांदेडकर रसिक प्रेक्षकांनी या बाल कलावंतांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे. या स्पर्धेचे समन्वयक म्हणून दिनेश कवडे हे काम पाहत आहेत.