त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचमागणी पडताळणी दिनांक 29 रोजी केली असता वरील आरोपींनी 10,000/- लाच मागणी करून तडजोडीअंती 6,000/- स्वीकारले. यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांना त्यांचे कालबद्ध पदोन्नतीचे फरका मधील मंजूर झालेल्या रक्कमेचे बिल पंचायत समिती मुखेड येथून पास करून देण्यासाठी 6,000/- रु लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम स्वीकारली आहे.
हि कार्यवाही डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद परिक्षेत्र औरंगाबाद अतिरिक्त पदभार नांदेड, धरमसिंग चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक लाप्रवि,नांदेड परिक्षेत्र नांदेड, राजेंद्र पाटील, पोलीस उपअधीक्षक लाप्रवि,नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी प्रकाश वांद्रे पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. नांदेड, सहा. सापळा अधिकारी, शेषराव नितनवरे ,पोलीस निरीक्षक ,ला.प्र .वि. नांदेड, यांच्या नेतृत्वाखाली सापळा पथक पोहेकॉ हणमंत बोरकर, पोना एकनाथ गंगातिर्थ, प्रकाश श्रीरामे चापोना नीलकंठ यमुनवाड लाप्रवि नांदेड यांनी यशस्वी केली.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा. अँन्टी करप्शन ब्युरो,स्नेहनगर पोलीस वसाहत नांदेड . @ दुरध्वनी क्रं. 02462-253512, @ मोबा.क्रं. 7350197197,@ टोल फ्रि क्रं. 1064 वर संपर्क साधावा.