नांदेड। जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील जांभळी या गावात स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा 2022 निमित्त भव्य रक्तदान शिबिर व शाहिरी जलसा पार पडला.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर साहेब यांनी अठरापगड जातीचे , बारा बलुतेदारांची बहुजनांचे जाणते राजे छत्रपती संभाजी राजेंच्या यशस्वी आमरण उपोषणाची माहिती दिली व आघाडी सरकारचे समाज सेवक म्हणून मनःपूर्वक आभार मानले . तसेच सध्याचे राज्यकर्ते स्वतःच्या स्वार्थासाठी काही पण करत आहेत पण आपला राजा पावसात भिजला, रस्त्यावरती आंदोलन केले, अन्नत्याग आंदोलन केले ते पण यशस्वी तेच खरे जनतेचे राजे व सध्याचे असे राज्यकर्ते काय करत आहेत असे मनोगत व्यक्त केले.
तसेच या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून मंगेश पाटील कदम, शाहीर प्राध्यापक शिवराज पाटील शिंदे व गजानन पाटील जाधव वाटेगावकर तर विशेष उपस्थिती म्हणून जिल्हाध्यक्ष तिरुपती पाटील भगनुरे, जिल्हाध्यक्ष सुनील पाटील कदम, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवाजीराव जाधव, मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष जयदीप वरखडे, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी माजी जिल्हाध्यक्ष सदा पाटील पुयड, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष वैभव पाटील राजूरकर, महासंघ जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील पवार , छावाचे उपाध्यक्ष विनायक पाटील , राजमुद्रा चे सचिन इंगोले व कार्यक्रमाचे आयोजक योगेश पाटील जांभळीकर व मान्यवर समस्त गावकरी उपस्थित होते .