ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्रा. के. एच. दरक यांचे आवाहन
नांदेड। १५ मार्च रोजी नांदेड येथे येणाऱ्या राम वन गमन रथयात्रेसाठी राम भक्तांनी आर्थिक सहकार्य करून शोभायात्रा व कवी संमेलन यशस्वी करावे असे आवाहन रथयात्रेच्या पूर्वतयारीच्या बैठकीत ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्रा. के. एच. दरक यांनी केले.
हनुमान टेकडी येथील सभागृहात झालेल्या बैठकीमध्ये संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा आपल्या प्रस्ताविकात सर्वांसमोर मांडला. मंगळवार दि. १५ मार्च रोजी दुपारी तीन वाजता रेणुका माता मंदिर गाडीपुरा येथून शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे.
जुना मोंढा, गुरुद्वारा चौरस्ता, महावीर चौक, हनुमान पेठ, मुथा चौक, शिवतीर्थ, गांधी पुतळा, चिखलवाडी कॉर्नर, महावीर चौक मार्गे मल्टीपर्पज हायस्कूलच्या मैदाना पर्यंत शोभायात्रा जाणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता मल्टीपर्पज हायस्कूलच्या मैदानावर भव्य कवीसंमेलन व संत संमेलन होणार आहे. या संमेलनात हिंदू धर्मातील प्रत्येक जातीच्या प्रमुखांचा सन्मान करण्यात येणार आहे.
बैठकीमध्ये ॲड. चिरंजीलाल दागडिया, गणेश कोकुलवार, धीरज स्वामी, शशिकांत पाटील,डॉ. जुगलकिशोर धूत,राज यादव यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. या सोहळ्यासाठी मुख्य स्वागत समिती तयार करण्यात आली असून त्यामध्ये डॉ. हंसराज वैद्य, दिलीप मोदी प्रा.दरक, इंद्रप्रकाश प्रेमचंदनी, अमर लालवाणी, ॲड. मिलिंद एकताठे, श्रीराज चक्रवार, राहुल हंबर्डे, सुभाष कन्नावार,ॲड.दागडिया,तरूण सहाणी यांचा समावेश आहे.
बैठकीचे सूत्रसंचलन श्रीराज चक्रवार यांनी केले तर आभार सागर जोशी यांनी मानले. बैठकीला व्ही.एन. कंडारकर, प्रेमानंद शिंदे, अखिलेश कुलकर्णी, विजय बोगेवार, मुकेश फुलारी, प्रकाश शर्मा, कृष्णा बियाणी,सागर शर्मा, शिवासिंह ठाकूर, हितेश उदावंत, पुष्कर शर्मा, तरुण सहानी, व्ही.एन. कंडारकर, मोनू सहानी यांच्यासह अनेक राम भक्त उपस्थित होते. पुढील बैठक २७ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता हनुमान टेकडी नांदेड येथे होणार असल्याची माहिती दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.