शिवणी। किनवट तालुक्यातील अप्पारावपेट-शिवणी परिसरातल्या वाडी तांड्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आले. तर शिवप्रेमी तरुणांनी इस्लापुर ते शिवणी व अप्पारावपेट परिसरातल्या गावोगावी मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती.
अप्पारावपेट येथील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजा रोहन करून अभिवादन करण्यात आले होते. अप्पारावपेट सह चौकात शिवणी व के प्रा शाळेत व ग्रामपंचायत कार्यालय शिवणी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.
यंदा कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी झाल्यानं स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवणी,अप्पारावपेट परिसरातल्या वाडी-तांड्यात ग्रामीण भागात उत्साहात साजरी करण्यात आली आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून कोरोना संसर्गाचा परिस्थिती मुळे मागील तीन वर्षांच्या तुलनेत या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयतीनिमित्त शिवप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण पाहण्यास मिळाले.
शिवणी,अप्पारावपेट येथिल मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.तर अप्पारावपेट येथील भांडार गृह समोर असलेल्या मुख्य चौकात ध्वजा रोहन करण्यात आले.या वेळी येथील सरपंच यलय्या कोतलगाम, जि.प. सदस्य सूर्यकांत आरंडकर, भाजपा तालुका सरचिटणीस बालाजी आलेवार, पोलीस पाटील संघटनेचे शिवराम जाधव,मनोज राठोड,बंटी आडे,बाळू शेरे,रुपेश देशमुख, मराठी पत्रकार परिषद तालुका सचिव प्रकाश कार्लेवाड,पत्रकार ईश्वर जाधव, अप्पारापेठ येथील.
पो.पा.भूमारेड्डी लोकावार, कौड यरन्ना, श्रीनिवास कौड, नरेश कौड, प्रभाकर कट्टा पांडुरंग चील्हावार, धर्मराज मामेडी, सदानंद देशमुख वीजूर हनुमंत रेड्डी,कौड सत्यनारायण सर, दिगंबर पाटील आमलापूर, नरेंद्र तोटेवाड, सुरेश कौड, प्रदीप सावते, गंगाधर गुंडेलवार, प्रवीण अप्परवपेट, शुभम देशमुख,राजू पाटील,महेश कोंडलवाड सह इस्लापुर, शिवणी,अप्पारावपेट येथील युवा तरुण शिवभक्त मंडळी मोठया प्रमाणात उपस्थित होते.जयंती कार्यक्रमाचे सूत्र संचलन भुरे सर यांनी केले.
तर शिवणी येथे ग्रामपंचायत कार्यालय व के.प्रा शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली यावेळी सरपंच सौ.लक्ष्मीबाई डुडुळे , उपसरपंच प्रतिनिधि संतोष जाधव, ग्रा.प सदस्य नर्मदाबाई बोंदरवाड, दिगाबर बोंदरवाड, यादव आमले ,शंकरराव भिसे ,रामचंद्र खंडेलवाल, भोजराज देशमुख, प्रकाश कार्लेवाड, रोशन खाॅन पठाण, गोविद कार्लेवाड, सुरेश जाधव, ज्ञानेश्वर कटकेमोड, ग्रामविकास अधिकारी धसकनवार, शारूख खाॅन पठाण, दिनेश अष्टपोलु, नागेश बेलयवार, तसेच शिवणी बस स्थानक चौकात शिवजयंती उत्सव साजरी करण्यात आली.
शुभम देशमुख, नागेश शिन्दे ,समर्थ माने , पंकज सुर्यवशी ,साईनाथ बैलवाड, शुभम पेशवे प्रशांत देशमुख, नयन देशमुख, ऋषीकेश देशमुख, ओमकार देशमुख, श्रीधर कदम ,लक्ष्मीकात देशमुख, नागेश बेलयवार, श्रीकांत शिलारवार, विनोद मेढेवाड, शिवम लिंगपुजे ,शिवम पडलवार, संतोष गोपनवाड ,सतिष शिन्दे आदि उपस्थित होते.