वंटेकर दांपत्याचे "सेट" परिक्षेत उल्लेखनीय यश -NNL

पती-पत्नी एकाचवेळी सेट परिक्षा उत्तीर्ण


मुखेड, रणजित जामखेडकर|
यूजीसी व सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या मार्फत सहाय्यक प्राध्यापक पदावर जॉइनींग साठी घेतल्या जाणाऱ्या सेट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन या निकालात मुखेड शहरातील झेप कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी प्रिय शिक्षक महेश वंटेकर हे लाइफ सायन्स तर त्यांच्या पत्नी सौ.सोनम महेश वंटेकर यांनी एज्युकेशन या विषयातून एकाचवेळी सेट परीक्षा उत्तीर्ण होऊन एक नवीन इतिहास रचला कदाचित ही पहीलीच घटना असेल जिथे पती - पत्नी एकदाच सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. 

झेप क्लासेसच्या माध्यमातून शैक्षणीक क्षेत्रात ठसा उमटवणारे महेश वंटेकर यांचे शालेय शिक्षण मुखेड शहरातील गुरुदेव विद्या मंदिर येथे झाले व अकरावी व बारावीचे महाविद्यालयीन शिक्षण दयानंद महाविद्यालय लातूर तर बिएस्सी व एमएस्सी यशवंत महाविद्यालय नांदेड येथे पुर्ण झाले ते एसबीआय बँँकेतील निवृृत कॅशियर माधवराव वंटेकर यांचे चिरंजीव आहेत. 

त्याचबरोबर सौ. सोनम महेश वंटेकर यांच शालेय शिक्षण लातूर येथे तर इंजिनिअरिंग नांदेडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग येथुन पुर्ण झाल त्यानंतर त्यांनी कार्लोक्स टिचर युनिव्हर्सिटी येथुन एम.ए.एज्युकेशन ची डिग्री मिळवली सोनम यांचे वडील एल.आर.कांबळे हे पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. वंंटेकर दांपत्याने सेट परिक्षेत घवघवीत यश प्राप्त कल्याबद्दल सर्व विद्यार्थी पालक, शिक्षक, मित्रपरिवार व विविध संघटनेचे पदाधिकारी, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी यासह सर्व स्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी