महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य के.बालाराजू सेवानिवृत्त -NNL


मुखेड, रणजित जामखेडकर|
शहरातील महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य के.बालाराजू हे नियतवयोमानानुसार ३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले आहेत .

सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.बी.अडकिने , प्रमुख पाहुणे संस्थेचे रणजित पाटील हंगरगेकर, मराठी विभाग प्रमुख प्रा.सी.बी.साखरे, सत्कारमूर्ति के.बालाराजू व सौ.राजलक्ष्मी , व्यासपीठावर अधिक्षक एस.के.सुर्यवंशी, प्रा.डी.बी.साखरे, पर्यवेक्षक प्रा.जी.एम. वायफणकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.जी.एम.वायफणकर, सूत्रसंचालन प्रा.बी.यू. गांजरे तर आभार प्रदर्शन प्रा.व्ही.एस.राठोड यांनी केले .

के.बालाराजू यांनी ३२ वर्ष ४ महीने या महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करीत असताना अनेक वर्षापासून उपप्राचार्य हे पद सांभाळलेले आहेत. यावेळी मनोगतात प्रा.सी.बी.साखरे , प्रा.डी.बी.साखरे , प्रा.बी.जी.पावडे , प्रा.सौ.एन.टी.चवळे यांनी त्यांच्या एकंदरीत कार्यप्रणाली , स्वभाव आणि उत्तम सेवा याविषयी विचार मांडले . सत्कारानंतर के.बालाराजू यांनी आपले कर्म आणि संस्थेने दिलेली संधी तसेच स्व.माधवराव पाटील हंगरगेकर , स्व.विश्वनाथराव पाटील हंगरगेकर , स्व. विठ्ठलराव पाटील चांडोळकर तसेच संस्थेतील अनेकांनी दाखविलेले विश्वास , प्रेम, जिव्हाळा जपत कार्य केल्याचे बोलून दाखविले. 

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एस. बी.अडकिने यांनी सेवानिवृत्तीच्या नंतर मिळणारे आयुष्य हे समाजातील सत्कारणी खर्च करावा . सामाजिक दायित्व पूर्ण करण्यासाठी कुठेच कमी पडू नये. उपप्राचार्य के.बालाराजू यांनी आपल्या कार्यकाळात उत्तम अशी कामगिरी केली असल्याचे समाधान व्यक्त केले. महाविद्यालय हे एक परिवार आहे . या परिवारातील एक सदस्य सेवानिवृत्तीच्या निमित्ताने होणारे भावनिक क्षण शब्दात व्यक्त करणे कठीण आहे असे विचार मांडले. बहुसंख्येने प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी