3 फेब्रुवारी पासून कंधार ते माहूर शिखर दिंडी पदयात्रा : नांदेड मार्गे प्रस्थान होणार- डॉ.मनिष वडजे -NNL


नांदेड| 
उद्या 3 फेब्रुवारी पासून कंधार ते माहूर शिखर दिंडी पदयात्रा निघणार आहे अशी माहिती यात्रेचे समनव्यक डॉ.मनिष वडजे यांनी दिली. 

प्रति वर्षांप्रमाणे याही वर्षी "दत्तकुंज निवास" बहादरपुरा येथून पायी दिंडी सोहळा माहुर शिखर गडावर पोहचणार आहे. दत्त शिखर संस्थानाचे महंत  श्री श्री श्री १००८ प.पू. महंत मधुसुदन भारती महाराज माहुर शिखर यांच्या आशिर्वादाने या पदयात्रा दिंडीस ३७ वर्ष पूर्ण होत आहेत. या वर्षी ही दिंडी ३ फेब्रुवारी २०२२ रोज गुरुवारी सकाळी ११:५५ वा.निघणार आहे. भाविक भक्तांनी या दिंडीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. माधवराव माणिकराव पा.पेठकर (श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष) यांच्या हस्ते पुजा व श्रीफळ फोडून दिंडीचे प्रस्थान होणार आहे.

दिंडीचे सुत्रसंचलन  डॉ.मनिष वडजे (मो. 9421755555) यांच्या नेतृत्वा खाली या दिंडीचे सुत्रसंचलन असुन त्यांना सहायक-दामोधर पा.पोरबांड तसेच माजी सभापती पं.स.कंधारचे  भाऊसाहेब पा.कदम मंगळसांगवीकर राहतील. दिंडीचे व्यवस्थापक  वसंतराव धोंडगे, रामराव डांगे, शंकरराव डांगे, दत्तात्रेय खरात, हनमंतराव सर्कलवाड, रघुनाथ पा.देवकर, ज्ञानोबा ताटे, बालाजी पा.मुदखेडे, बाबुराव डांगे, रूस्तुम पा.शेकापुरे (आचारी), पांडूरंग पा.वडवळे, साहेबराव पा.वडवळे, आचारी कापसीकर, अरविंद एमेकर, साहेबराव वंजे, हनमंत पालीमकर,राजु पेटकर, संजय एमेकर, गुंडेराव गायकवाड, अॅड.देवानंद देशमुख, लक्ष्मण वडजे हे आहेत.

भजनी मंडळी प्रल्हाद पा.कदम मंगलसांगवीकर संच कापसी बु., वडवळे संध, भुजंगराव बहूरे, अंबुलगा संच, बालाजी संभाजी कल्याणकर, गोगदरी संच, गोविंदराव पांचाळ दाताळ संच, चिंचोली, कंधार येथील भजनी मंडळ आहेत. रात्री प्रवचन व भजन होईल.मुकामाच्या ठिकाणी रात्री महापुजा होणार आहे. नांदेड येथे नानक साई फाऊंडेशन तर्फे दिंडी चे स्वागत करण्यात येणार आहे. 3 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी असा प्रवास करून हि यात्रा माहूर गडावर पोहचणार आहे. नांदेड, वारंगा, हदगाव, उमरखेड, महागाव माहूर असा प्रवास करत करत यात्रा गडावर प्रवेश करणार आहे असे डॉ.मनिष वडजे यांनी सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी