हिमायतनगर नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाचा कारभार शेतकरी - नागरिकांच्या मुळावर -NNL

टेंभी रोड ओला व सुका कचरा घनकचरा टाकल्यामुळे निर्माण झाले दुर्गंधीयुक्त वातावरण 


हिमायतनगर,अनिल मादसवार|
शहराजवळील मौजे टेंभी रोड वरिल सर्व्हे नं-230/1 मधिल जागेत नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून हिमायतनगर शहरात जमा झालेला ओला व सुका घनकचरा गुत्तेदार यांच्या माध्यमातून अनाधिकृतरित्या मुख्य रस्त्यावर उघड्यावर टाकले जात आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हि बाब लक्षात घेता तातडीनं येथे टाकण्यात येणारी घनकचऱ्याचे तातडीने नियोजन करावे आणि येथे घाण दुर्गधी टाकून प्रदुषण निर्माण करण्याऱ्यावर कायदेशिर कार्यवाही करावो. अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने लढा द्यावा लागेल असा इशारा निवेदनाद्वारे टेंभी, हिमायतनगर व परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

तहसीलदार याना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, हिमायतनगर शहरातील व मौजे टेंभी गावातील अनेक नागरिक, शेतकरी रात्री-बेरात्रीला शेतीकडे आणि गावाकडे नेहमी ये - जा करतात. गेल्या नऊ महिन्यापासुन हिमायतनगर नगरपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे दुर्गंधीयुक्त वातावरणाचा सामना करावा लागतो आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, अनेकदा सूचना देऊनही नगरपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून हिमायतनगर शहरात जमा केलेला ओला व सुका घनकचरा तसेच मृत जनावरे, कोंबडे, बकरे यांचे अवयव सुद्धा नगरपंचायतीच्या वाहनातुन दररोज टेंभी रस्त्याच्या कडेला टाकले जात आहे.

हिमायतनगर - टेंभी शिवारात रस्त्यावर उघड्यावर टाकण्यात येत असलेल्या घाण कचऱ्याची दुर्गंधी सुटून नाहक त्रास येथील शेतकरी व रहिवाश्यांना होत आहे. या ठिकाणी माहूरला निघणारा पांडव कालीन भुयारी मार्ग, आबा बकर, मसाई देवी, करीम शाह आणि जवळच पाण्याची खदान आहे. तसेच कचरा टाकला जात असलेले ठिकाण हे वनविभागाचे माळ टेकडीचे असल्याने या माळातील वन्यप्राण्यानां तसेच गावातील येणारे - जाणारे जनावरे पाणी पित असतात. जनावरासाठी पिण्याचे पाणी खदानीत असून, येथे टाकलेला घनकचरा खदानीत पडत असल्याने हे पाणी प्रदुषित होत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव पशूंना सदरील पाणी प्यावे लागत असून, हे दूषित पाणी पिल्याने जनावरे, पशु-पक्षी, हरीण व इतर जंगली प्राणी आजार ग्रस्त होऊन मृत्युमुखी पडत आहेत. 

प्राचीन पांडव काळापासुन या ठिकाणी आबा बकर व मसाई देवीचे आराध्य दैवत असल्याने येथे आस्था असलेले भाविक धार्मिक कार्यक्रम व पंगती करतात. परंतु या घाण दुर्गंधियुक क॑चऱयामुळे या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम पार पडताना सुध्दा भाविक, नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी शेतात व रस्त्यावरुन जाणाऱ्या - येणाऱ्यांच्या नाकेनऊ येत असून, या दुर्गंधीचा वासामुळे नागरिकांच्या आरॊग्याच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. अगोदरच कोरोना महामारीचा काळ सुरु असताना हिमायतनगर नगरपंचायत प्रशासनाकडून केले जाणाऱ्या या प्रकारामुळे नागरिक शेतकरी, वाहनधारक अक्षरशः वैतागले आहेत. 

याची प्रशासनाने गंभीरतेने दाखल घेऊन येथे टाकण्यात येत असलेली हिमायतनगर शहरातील दुर्गंधीयुक्त घाणी व केरकचऱ्याचा प्रकार तात्कळ बंद करण्यात यावा. अन्यथा लोकशाहीच्या मार्गाने आरोग्य हितासाठी नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात लढा उभारावा लागेल असे निवेदन देणाऱ्या नागरिकांनी सांगितले. या निवेदनावर उत्तम राव, मारोती गायकवाड, गणेश कमलवाड, परमेश्वर तुंबेवाड, अशोक बासेवाड, शारदाताई बासेवाड, ज्ञानदीप तुंगेवाड, श्यामराव माने, गजानन बंडेवार, बालाजी कामलवाड, चंदू गायकवाड, प्रकाश पिल्लेवाड, आनंद मुतनेपाड, प्रकाश पिल्लेवाड, देविदास पोष्टती, विठ्ठल अक्कलवाड, आदींसह टेंभी, हिमायतनगर भागातील अनेक शेतकरी, नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी