खुरगावच्या श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात छ. शिवाजी महाराज जयंती साजरी
नांदेड| छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध जाती धर्मांच्या लोकांना समानतेच्या तत्त्वावर वागविले. कोणताही धार्मिक कट्टरतावाद जोपासला नाही. माणसा माणसात भेदभाव केला नाही. शिवाजी महाराजांनी धर्मनिती समतेची होती असे प्रतिपादन येथील धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले. ते तालुक्यातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात शिवजयंती निमित्त आयोजित धम्मदेसना कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भंते संघरत्न, भंते चंद्रमणी, भंते धम्मकिर्ती, भंते श्रद्धानंद, भंते सुनंद, भंते सुदत्त, भंते शिलभद्र, भंते सुयश, भंते सुमेध यांच्यासह श्रामणेर भिक्खू संघ, विपश्यनाचार्य गौतम भावे, रत्नमाला भावे, प्रा. विनायक लोणे, शैलजा लोणे, माजी उपप्राचार्य साहेबराव इंगोले, सुरेखा इंगोले, प्रफुल्लता वाठोरे, सदाशिव गच्चे, विश्वनाथ दुधमल, प्रज्ञाधर ढवळे, कवी थोरात बंधू, पंकज शिवभगत आदींची उपस्थिती होती.
ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. माघ पौर्णिमेचे औचित्य साधून पौर्णिमोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दस दिवशीय शिबिरात सहभागी झालेल्या समर्थ राजभोज, केशव थोरात, रितेश दुधमल, विकी दुधमल, प्रियेश किर्तने, चरण जमदाडे, धारबा धुमाळे, उत्तम सोनकांबळे, आदेश ससाणे, रोहन रणवीर, भीमराज ससाणे या बाल उपासकांच्या श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचा समारोप करण्यात आला. प्रारंभी बोधीपुजा संपन्न झाली.
त्यानंतर पुष्पवृष्टी करीत भिक्खू संघाला धम्ममंचावर पाचारण करण्यात आले. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तसेच शिवजयंती निमित्त छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शहरातील राजनगरच्या महिला मंडळाच्या वतीने याचना केल्यानंतर संघाने त्रिसरण पंचशील दिले. परित्राणपाठ, त्रिरत्न वंदना, गाथापठण संपन्न झाले. यानंतर भंते संघरत्न यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. सुशील जोंधळे, धम्मदिना शिवभगत, प्रज्ञाधर ढवळे यांनी आपले विचार व्यक्त केले. विपश्यनाचार्य गौतम भावे यांनी आनापान ध्यानसती साधना कार्यक्रम घेतला.
पहिल्या सत्रात राजनगर येथील महिला मंडळाच्या वतीने भिक्खू संघाला तसेच उपस्थित उपासक उपासिकांना भोजनदान देण्यात आले. धम्मदेसना देत असताना धम्मगुरू भदंत पंय्याबोधी म्हणाले की, खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात दहा फूट उंच संगमरवरी दगडाची अखंड पाषाणात कोरलेली बुद्धमूर्ती बसविण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दानाची आवश्यकता आहे. सर्वांनी दान पारमिता करुन पुण्यवान बनावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहेबराव इंगोले यांनी केले. सूत्रसंचालन प्रज्ञाधर ढवळे यांनी केले तर आभार नागोराव नरवाडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदिप सोनकांबळे, आप्पाराव नरवाडे, वामनराव नरवाडे, उमाजी नरवाडे, सुरेखा नरवाडे, राहुल नरवाडे, रवी नरवाडे, कल्याणी नरवाडे यांच्यासह राजनगर येथील महिला सुमनबाई कांबळे, इंदूबाई खंदारे, अर्चना कांबळे, अंजना गोणारकर, सुशिला भुक्तरे, गंगाबाई सूर्यवंशी, भारतबाई चोपडे, मुक्ताबाई जोंधळे, देऊबाई गोडबोले, वंदना गायकवाड, कांताबाई घुले, रुक्मिणीबाई लांडगे, पद्मिणबाई निखाते, प्रेरणा पडघणे, विमलबाई भगत, लक्ष्मीबाई गायकवाड, रंजना भालेराव, सुमनबाई सोनवणे यांनी परिश्रम घेतले.