नांदेड| महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यशाळा (वर्कशॉप) नांदेड येथील दुखवटा लढा विलीनीकरणामधील कर्मचार्यांच्या वतीने आंदोलन मंडपात दि. ३१ जानेवारी २०२२, सोमवार रोजी सायंकाळी ठिक ५ वाजता सर्व ट्रेडच्या कॅटेगिरीचे मिळून एकूण ५६ मुलं-मुली शिकावू उमेदवार (ऍप्रेन्टीशिप) प्रशिक्षणार्थींचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण करुन प्रशिक्षण संपल्यामुळे एसटी कर्मचार्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन निरोप देण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड, रामदास पेंडकर, चंद्रकांत पांचाळ, अभिषेक ताकझुरे, बालाजी भिसे, शरद वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, शिकावू उमेदवारांनी प्रशिक्षण घेताना चालता- बोलता आंदोलक एसटी कर्मचार्यांशी खूप जवळून संबंध आला असून कमी वयात, कमी वेळात आंदोलन कसे असते हे पण आपण शिकले असून भविष्यात आपल्या कौशल्य प्रशिक्षणाचे चिज करावे असे प्रतिपादन केले.
ते पुढे बोलताना आपल्या भाषणात म्हणाले की, आपण आपल्या ग्रामीण भागात गावी गेल्यानंतर एसटीचे शासनात विलीनीकरण झाल्यानंतर प्रवाशांना फायदे व दर्जेदार सेवा नक्की मिळणार असून ही जनजागृती करुन शासनाकडे विलीनीकरणासाठी प्रवाशांच्या माध्यमातून आपण मागणी करावी व आपण आपल्यावतीने निधी संकलन करुन दुखवट्यातील कर्मचार्यांना एकदिवस भोजन अन्नदान केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानून भावी कार्यास शुभेच्छा देतो असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. रामदास पेंडकर यांनी केले तर आभार चंद्रकांत पांचाळ यांनी मानले. यावेळी आंदोलक कर्मचारी मोहम्मद मुस्तफा, भगवान दुधारे, गोविंद हाळे, प्रभाकर मोरे, ज्ञानेश्वर पांचाळ, रमेश बोन्लावार, भीमराव चावरे, भास्कर पांचाळ, सुपलकर, रवी मुगटकर, संतोष सगर, संभा जोगदंड, उमाकांत बोड्डेवार, भुरेवार, आबा कुलकर्णी, संदीप घोडेकर, जी.पी. मोगले, सचिन जामकर हे कर्मचारी उपस्थित होते.