एमजी मोटरद्वारे हरित व शाश्वत दृष्टीकोनासह मोबिलिटी सोल्यूशन्सची निर्मिती -NNL


मुंबई|
एमजी मोटर भारतामध्ये शाश्वत ऑटोमोटिव्ह उद्योगक्षेत्र निर्माण करण्याबाबत नेहमीच अग्रस्थानी राहिली आहे. कंपनीने नुकतेच एन्व्हायरोन्मेंट मॅनेजमेंट सिस्टिम (ISO 14001 – 2015) आणि ऑक्युपेशनल, हेल्थ अॅण्ड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टिम (ISO 45001 – 2018) हे आयएसओ प्रमाणन प्राप्त केले आहेत. तसेच एमजी आपल्या कार्यसंचालनामध्ये कार्बन-न्यूट्रल व नेट-झीरो उत्सर्जन दृष्टीकोनाचा अवलंब करण्याप्रती देखील काम करत आहे.

आयएसओ प्रमाणनांव्यतिरिक्त एमजी मोटरने इतर काही शाश्वतपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी केली आहे, जसे ७००० हून अधिक वृक्षारोपण आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी १२ पावसाच्‍या पाण्याचे पुनर्भरण करणा-या विहिरी. एमजीने एनर्जी कमिटीच्‍या माध्‍यमातून ऊर्जा उत्पादकता वाढवण्याप्रती आणि शून्य-कचरा भरावाची जागा बनण्याप्रती देखील काम केले आहे. तसेच परिसरांमध्ये ९२ एमटी एलपीजी व २२ एमटी एलएनजी स्टोरेजच्या प्रमुख घातक इन्स्टॉलेशनचा धोका दूर करण्यासाठी एमजीआय प्लाण्टला राज्य सरकारकडून एमएएचवरून (मेजर अॅक्सिडण्ट हजार्ड युनिट) नॉन-एमएएच युनिटमध्ये बदलण्यासंदर्भात अधिसूचित करण्यात आले आहे.

एमजी मोटरच्या स्थिरतेप्रती सर्वांगीण दृष्टीकोनाने कंपनीला नव्‍या उंचीवर पोहोचण्यास व त्यापलीकडे जाण्यास सक्षम केले आहे. कंपनी ईव्ही अवलंबतेला चालना देण्यामध्ये, बॅट-यांचे पुनर्चक्रण करण्यामध्ये आणि ग्राहकांसाठी आधुनिक ईव्ही लाँच करण्यामध्ये अग्रस्थानी राहिली आहे. अटेरोसोबतचा कंपनीचा विद्यमान सहयोग भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या लि-आयन बॅट-यांचे पुनर्चक्रण करत एण्ड-टू-एण्ड ईव्ही परिसंस्था निर्माण करतो. कंपनीचा टीईएस-एएमएमसोबत आणखी एक सहयोग देशामध्ये ईव्ही बॅट-यांच्या जबाबदारपूर्वक पुनर्चक्रणाची खात्री देखील देतो.

कंपनीने पवन-ऊर्जा हायब्रिड ऊर्जेचा अवलंब करणारी पहिली पॅसेंजर कार उत्पादक म्हणून उदयास येण्यासाठी क्लीनमॅक्ससोबत सहयोग केला आहे. या सहयोगाचा भाग म्हणून एमजीचे हलोलमधील उत्पादन केंद्र त्यांच्या कार्यसंचालनांसाठी क्लीनमॅक्सने पुरवठा केलेल्या ४.८५ मेगावॅट पवनऊर्जेचा वापर करेल, ज्यामुळे १५ वर्षांमध्ये २ लाख दशलक्ष टन कार्बन डायऑक्साईडचा वापर दूर होईल, जे १३ लाखांहून अधिक झाडांचे रोपण करण्याइतके आहे. एमजी मोटरने ड्राय कार वॉशिंगला चालना देण्यासाठी, प्रतिकार प्रतिमहिना जवळपास १४ लाख लिटर पाण्याची बचत करण्यास लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्या नवीन उपक्रमाची (एन्व्हायरो वॉश) देखील घोषणा केली आहे. कंपनी स्थिर गतीशीलतेला हरित बनवण्याचा प्रयत्न करते आणि कंपनीचा भविष्यात इतर स्थिर उपक्रम राबवण्याचा मनसुबा आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी