शासकीय महापूजा होईल; कोरोनाचे नियम पाळून श्री दर्शन घेण्याची मुभा - महावीरचंद श्रीश्रीमाळ
हिमायतनगर,अनिल नाईक | कोरोनाचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी गर्दी होणार नाही यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. दरवर्षीं महाशिवरात्री निमित्त होणाऱ्या हिमायतनगर (वाढोणा) येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वराची यात्रा कोरोना नियमांचे पालन करुन यंदाही रद्द करण्यात आली आहे. याबाबतचा ठराव दि.०८ फेब्रुवारी २०२२ रोजी मंदिर कमिटी सदस्यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी दिली आहे. तसेच श्री परमेश्वर महाराजांच्या मूर्तीची शासकीय अभिषेक, महापूजा संपन्न झाल्यानंतर भाविकांना कोरोनाच्या नियमाचे पालन करून दर्शन घेता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षपासून परंपरेनुसार हिमायतनगर येथील श्री परमेश्वराची यात्रा महाशिवरात्रीच्या एकादशी पासून सुरु होऊन होळी ते रंगपंचमीपर्यंत म्हणजे १५ दिवस चालविली जात होती. परंतु गेल्या २ वर्षांपासून जागतिक महामारी कोरोनामुळे शासनाने गर्दी टाळण्यासाठी नियमावली ठरून दिलेली आहे. त्या नियमावलीची अंमलबजावणी करून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून सर्वांचा बचाव व्हावा यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र शासन महसूल, व जिल्हाधिकारी नांदेड यांचे आदेशाचे पालन करत दि.२८ फेब्रुवारी २०२२ पासून भरणारी श्री परमेश्वर देवस्थानची यात्रा रद्द करण्याचा निर्णय मंदिर कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार व मंदिर संचालकांच्या उपस्थितीत घेण्यात आला आहे.
त्यामुळे सप्ताहात स्थानिक भाविक भक्ताना मंदिरात सोशल डिस्टन्स ठेऊन श्री परमेश्वर महाराज आणि शिवपती महादेवाचे दर्शन घेता येईल. असेहि आज घेण्यात आलेल्या बैठकीत ठरविण्यात आले आहे. या बैठकीस मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महविरचंद श्रीश्रीमाळ, लक्ष्मण शक्करगे, प्रकाश शिंदे, विठ्ठलराव वानखेडे, वामनराव बनसोडे, मुलचंद पिंचा, संभाजी जाधव, माधव पाळजकर, मथुराबाई भोयर, लताबाई पाध्ये, लताबाई मुलंगे, शांतीलाल श्रीश्रीमाळ, अनिल मादसवार, बाबुराव भोयर गुरुजी, देवराव वाडेकर, शिवाजी रामदिनवार, बंडू हरडपकर, विजय दळवी आदींसह मंदिर कमिटीचे सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.