महामार्ग रस्त्यासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला तात्काळ द्या; अन्यथा सामूहिक आत्मदहन करणार -NNL

जमिनीच्या मावेजा न मिळाल्यास वंचित शेतकरी घेणार टोकाचे पाऊल   


हिमायतनगर, अनिल मादसवार|
हिमायतनगर -  भोकर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या कामासाठी  गेलेल्या शेत जमिनीचा मोबदला तात्काळ देण्यात यावा. अशी मागणी अनेकदा करण्यात अली, यासाठी आंदोलने देखील केली. मात्र शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला देण्यात आला नाही, त्यामुळे अखेर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ मोबदला द्या अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. 

उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी हदगाव यांना देण्यात आलेल्या निवेदनात नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, हिमायतनगर - भोकर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर सोनारी फाट्याजवळ टोल नका राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ साठी प्रस्तावित आहे. त्यासाठी सोनारी व सरसम येथील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या म्हणून दि. २६ फेब्रुवारी २०१८ रोजी निवेदन देवून मावेजा मिळण्यासाठी मागणी केली होती. जवळपास टोलनाक्याच्या कामही पुर्णत्वाकडे गेले असून, केवळ येथील शेड उभारणीचे काम होणे बाकी आहे. मात्र रस्ताही संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही. 

संबंधित शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी हदगाव यांच्याकडे निवेदन दिले असता दि.११ ऑक्टोबर २०१९  रोजी तिन महिन्याच्या आत सदरील शेत जमिनीचा मोबदला दिला जाईल असे लेखी पत्र देण्यात आले होते. परंतु आद्यपही मोबदला देण्यात आला नसल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गवर रास्तारोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. येथील अर्धवट टोलनाक्याच्या कामामुळे अनेक अपघातही घडले आहे. या घटना होणार नाहीत म्हणून टोलनाक्याच्या काम पूर्ण व्हावे आणि त्याचबरोबर सातत्यानं पाठपुरावा करून शेतकर्यां मोबदलाही द्यावा अशी मागणी करण्यात आली. 

एवढेच नाहीतर मोबदला मिळत नसल्याने दि.१८ नोव्हेंबर २०२१ रोजी सदरील शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता. यास एक दिड महिन्यात मोबदला देण्याचे पुन्हा एकदा आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. परंतू शेतकऱ्यांच्या पदरी पून्हा एकदा घोर निराशा पडली आहे. त्यामुळे आता आम्हा शेतकऱ्यांच्या भावनाचा बांध फुटला असून, आत्मदहना शिवाय आम्हाला दुपार पर्याय नाही.

तात्काळ मोबदल द्यावा म्हणून आम्ही नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनासह मंत्री, खासदार, आमदार यांचीही भेट घेऊन निवेदन दिले. परंतू त्यांनीही आमच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही. म्हणून दि.१२ फेब्रुवारी २०२२ पर्यत मोबदला दिला नाही तर नाईलाजास्तव दि.१५ फेब्रुवारीला दुपारी ०१ वाजता सामूहिक आत्मदहन करणार आहोत असे शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. या निवेदनावर विलास नारायण सुर्यवूशी, शेख युसूफ शेख खाजा, गंगाधर गणपती तिरमलवार, संतोष भावराव तिरमलवार, शेख जलील शे. चांद, मुजाहत खान बाजमत खान, शेख असीफ शेख अब्दुल, शेख रशीद शेख करीम आदिंसह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी