विकासासाठी काँग्रेस पक्ष कटीबद्ध. आ मोहनराव हंबर्डे -NNL

नविन नांदेड। मतदार संघाच्या  विकासाठी काँग्रेस पक्ष कटीबद्ध असल्याचे सांगून दक्षिण मतदारसंघाचा विकासासाठी ३६५ कोटी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून विविध विकासात्मक कामासाठी निधी उपलब्ध करून दिले असून  मनपा दक्षिण विभागातील मनपा  लोकप्रतिनिधींना ५० लाख रुपये विकासात्मक कामासाठी दिले  असल्याचे सांगून महाविकास आघाडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास होत असल्याचे प्रतिपादन आ.मोहनराव हंबर्डे यांनी सिडको परिसरातील जिजामाता वसाहत येथे मुलभूत सुविधा अंतर्गत ७५ लक्ष रुपये निधी कामाचा शुभारंभ प्रसंगी केले.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ अ मधील  नगरसेविका सौ.चित्रा सिध्दार्थ गायकवाड यांनी सिडको भागात मूलभूत सोयी-सुविधा अंतर्गत ७५ लक्ष रुपयांच्या कामाचे भूमि पूजन सोहळा ८ फेब्रुवारी आयोजन करण्यात आले होते,या वेळी  भूमिपूजन सोहळ्याचे उद्घाटन आ. अमर राजूरकर, आ. मोहनराव हंबर्डे, जिल्हा परिषद सदस्य मनोहर् शिंदे, पक्ष प्रवक्ते संतोष पांडागळे, यांच्या हस्त करण्यात आला, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक राजू पाटील

काळे, राजू गोरे, माजी उप- महापौर विनय पाटील गिरडे, युवा नेते उदय देशमुख, माजी नगरसेवक संजय इंगेवाड,शाम जाधव,  महिला अध्यक्षा , माजी नगरसेविका प्रा.सौ.ललीता शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख उध्दव पाटील शिंदे, अल्पसंख्याक दक्षिण अध्यक्ष अस्लम शेख, माजी  ऊप संरपच संभाजी जाधव यांच्या जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी आ. हंबर्डे यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासात्मक कामांसाठी निधी उपलब्ध करुन दिले असल्याचे सांगून आगामी जिल्हा परिषद व महानगर पालिका निवडणुक अनुषंगाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे ‌असे सांगितले.

राज्यातील सर्वात मोठा निधी बजेट मध्ये मोहन हंबर्डे यांच्या असल्याचे सांगून विविध विकासात्मक कामे निवडणूक पुर्व नगरसेवक यांच्या मागणी नुसार ५० कोटी रुपये दिले असल्याचे सांगून  विविध विकासात्मक कामांच्या शुभारंभ होणार असल्याचे सांगून ‌, येणाऱ्या काळात १ हजार ४ कोटी रुपयांची विकासात्मक कामे होणार असल्याचे सांगितले.

नगरसेविका सौ चित्रा गायकवाड यांचे प्रतिनिधी  माजी नगरसेवक सिध्दार्थ गायकवाड यांनी  कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले ,तर दिंगांबर शिंदे यांनी सुत्रसंचलन केले .या सोहळ्याला साहेबराव जाधव,अनिल कोतावार, संतोष तेलंग, व्यंकटेश अन्ना, राजु अंबेगावकर, भागवत शिंदे, संतोष देशमुख,विजय निमनवाड,बकंट गगड , गिरीश सर देशपांडे, मारोती शिंदे,  जेष्ठ नागरिक शिंदे काका,आंनदा गायकवाड, देविदास कदम, स्वामी, देशमुख,के.एल.ढाकणीकर,दलीत मित्र नारायण कोंलबीकर, वामनराव देवसरकर,भिमराव जमदाडे,  प्रितम लिबेकर,मुझाहीद पठाण,यांच्या सह नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी