नविन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या नगरसेवकांना आपल्या प्रभागात नागरीकांना मुलभूत सुविधा अंतर्गत विविध कामे उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगुण रस्ते,पाणी, दिवाबत्ती यासह विविध विकासात्मक कामे सुरू असल्याचे आ.अमर राजुरकर यांनी मनपा प्रभाग क्रमांक १९ ब मधील विशेष एक कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ प्रसंगी केले.
मनपा प्रभाग क्रमांक १९ मधील विविध विकासात्मक विशेष एक कोटी रुपयांचा विविध विकासात्मक कामाचा शुभारंभ आ.अमर राजूरकर,आ.मोहन हंबर्डे, सभापती किशोर स्वामी,पक्ष पक्षप्रवकते संतोष पांडागळे, नगरसेवक राजू काळे,राजू गोरे, अल्पसंख्याक दक्षिण अध्यक्ष शेख अस्लम,यांच्या ऊपसिथीत ८ फेब्रुवारी रोजी वसरणी येथे करण्यात आला. येणा-या वर्षा मध्ये विविध विकासात्मक कामे झाल्याचे चित्र नांदेड शहर व तालुक्यात , जिल्ह्यात विविध विकासात्मक कामे अनेक कोटी रुपयांचा माध्यमातून होणार असल्याचे आ.राजुरकर यांनी सांगितले.
दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आ.मोहनराव हंबर्डे यांनी कोरोना काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून व पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शासकीय रुग्णालयात अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या मुळे अनेक रूगनांचे जिव वाचल्याचे सांगितले, जिल्हायासाठी पाच हजार कोटी तर दक्षिण मतदार संघासाठी भरीव निधी दिल्याचे सांगितले, व पहिला टप्पा विकासाच्या शुभारंभ झाला असल्याचे यांनी सांगुन विकासाच्या मागे खंबीरपणे नागरीकांनी उभे राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले.
या उद्धाटन सोहळ्याला सि.टी.कांबळे,साखाराम शितळे, मिरजकर, गंगाधर काळे, सुर्यवंशी,बाबु गजले, पुंडलिक काळे,देवानंद सरोदे,नरहारी अवनुरे,संजय जौधळे, भालचंद्र मोळके, भिवाजी वडजे,व परिसरातील नागरीक,महिला युवक मोठ्या प्रमाणात ऊपसिथीत होते.
नावघाट गोदावरी नदी येथे गणपती व दुर्गा विसर्जन साठी घाट निर्माती करण्यात यावी अशी मागणी सौ.दिपाली मोरे यांनी केली . कार्यक्रम चे प्रास्ताविक संतोष मोरे सुत्रसंचलन राजु लांडगे यांनी तर माजी नगरसेवक संजय मोरे ,अरजृन मोरे यांनी परिश्रम घेतले.