स्वामी ग्रुप तर्फे शिवजयंती निमित्त शालेय साहित्य वाटप - NNL


मालेगाव|
स्वामी ग्रुप च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त नांदुसा येथील जि.प.शाळे मध्ये विविध महापुरुषांचे चरित्र असलेले ग्रंथ व शालेय साहित्य 300 विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. 

कोरोना काळात रुग्णांना अवीरत पने 2 महिने मोफत रुग्णांचा जेवणाची सेवा केलेल्या स्वामी ग्रुप चे अध्यक्ष शुभम स्वामी यांनी समाज कार्याचा वसा चालू ठेवत शिव जयंती निमित्त विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केले. 

कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी सरपंच प्रतिनीधी भास्कर जनकवाडे, प्रमुख पाहुणे म्हणुन सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र महाजन, सुभाशिष कामेवार, केदार पाटील, लक्ष्मणराव जनकवाडे, नीलकंठ जनकवाडे, नागेश जनकवाडे, अविनाश राजेगोरे ,मुंजाजी चिंचोलकर, धोंडीबाराव माली पाटील, झोलबाजी जनकवाडे, भगवान जनकवाडे आदींची उपस्थिती होती तर आपल्या मनोगतात बोलताना शुभम स्वामी यांनी महापुरुषांचा संघर्षा मुळे आपल्या समाजाची निर्मिती झाली आहे. 

त्यांचे विचार आजच्या पिढीला कळावे या हेतूने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हा उपक्रम घेत असल्याचे सांगीतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेहाल दासे, मुकेश पाटने, सतीश घुमे, अभी आवर्दे, शिवराज देलमडे, रुषी दासे, साई दासे, मुन्ना जनकवाडे, साई जनकवाडे, राजु पवार, ओम जनकवाडे, सत्यम स्वामी आदिंनी परीश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी