उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा दौरा -NNL


नांदेड|
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे नांदेड दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.  

सोमवार 28 फेब्रुवारी 2022 रोजी पुणे येथून विमानाने सकाळी 9.45 वा. श्री गुरु गोबिंद सिंहजी विमानतळ नांदेड येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सकाळी 10 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. 

सकाळी 10.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून मोटारीने धनगरवाडी कडे  प्रयाण. सकाळी 10.30 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृह 200 क्षमतेच्या इमारत बांधकामाच्या भूमिपूजन समारंभास उपस्थिती. स्थळ- साईबाबा मंदिरासमोर धनगरवाडी. सकाळी 11 वा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण अभ्यासिका संकुलाचे बांधकाम भूमिपूजन समारंभास उपस्थिती. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या परिसरामध्ये शासकीय अध्यापक महाविद्यालय इमारतीच्या बांधकाम भूमिपूजन समारंभास उपस्थिती. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड परिसरामध्ये 100 प्रवेश क्षमता असलेल्या मुलींचे वसतीगृह इमारतीचे बांधकाम भूमिपूजन समारंभास उपस्थिती. स्थळ- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ उपकेंद्र परिसर नांदेड. 

सकाळी 11.30 वा. बीएससी नर्सींग कॉलेज शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील टप्पा 2 अंतर्गत मुख्य प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन समारंभास उपस्थिती. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील प्रशासकीय व ग्रंथालय इमारतीच्या आधुनिकीकरण, सौंदर्यीकरण कामांच्या शुभारंभ सोहळ्यास उपस्थिती. 

स्थळ- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील मुख्य प्रशासकीय इमारत. दुपारी 12.30 वा. पत्रकार परिषद स्थळ- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील प्रशासकीय इमारत. दुपारी 1 वा. आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट स्थळ- विष्णुपुरी नांदेड. दुपारी 1.30 वा. विष्णुपुरी नांदेड येथून श्री गुरु गोबिंद सिंहजी विमानतळ नांदेडकडे प्रयाण. दुपारी 2 वा. श्री गुरु गोबिंद सिंहजी विमानतळ नांदेड येथून विमानाने नाशिक कडे प्रयाण करतील.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी