नांदेड| माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार सहयोगनगर येथे आज दि.25 फेब्रुवारी 2022 शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता भिक्खु संघास भोजनदानच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुज्य भिक्खु शिलरत्न यांच्या अध्यक्षतेखाली सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
भिक्खु संघाने सर्व सहयोगनगर परिसर मंगलमय गाथेसह संचलन करुन पुनित केला. तसेच ठिकठिकाणी भिक्खु संघाचे उपासक-उपासीकांनी पुष्प देवून त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमात पुज्य भिक्खु बी.संघपालजी महाथेरो, व्यवस्थापक चैत्यभूमी, मुंबई, पुज्य भिक्खु सत्यानंद महाथेरो बुद्धगया यांनी भिक्खु संघासह बौद्ध उपासक-उपासिकांना धम्मदेसना दिली. दानाचे महत्व विषद करुन धम्म कार्यास बळ देण्यासाठी उपस्थितांना संबोधीत केले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सिध्दार्थ जोंधळे, प्रफुल्लदादा सावंत, भारतीय बौद्ध महासभेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष पी.एम.वाघमारे, सुभाष काटकांबळे, सुभाषराव डोंगरे, भारतीय बौद्ध महासभेचे उत्तर जिल्हा सरचिटणीस रवि जोंधळे, ईश्र्वरराव जोंधळे, अमोल सोनकांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे युवराज मोरे, भगवानराव येवले, सुनिल गोधने, के.जी.रावणगावकर, विजय गोडबोले यांच्यासह समता सैनिक दलातील सैनिक, उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला मंडळाच्या जयाताई सूर्यवंशी, पुष्पाताई भरणे, रेखाताई कोकरे, भारतीताई बिर्हाडे, गंगासागरताई मल्हारे, सोनाळे ताई, महाबळे ताई, शेरेताई, लंकेताई, कल्पनाताई ओव्हाळ, युवा स्वंयसेवक राजेश बिर्हाडे, रमेश कोकरे, साहेबराव गायकवाड, राज अटकोरे, हंसराज काटकांबळे, मनोज दवणे, प्रसेनजित मांजरमकर, युवा मंडळ आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार रमेश कोकरे यांनी मानले.