हिमायतनगरात भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या युवकावर भरदिवसा चाकू हल्ला -NNL

४ महिन्यातील तिसरी घटना घडल्याने कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर 

हिमायतनगर|
शहरात  रविवारी दुपारी रविवारी १२ वाजेच्या सुमारास बसस्थानक परिसरात दोन युवकांचे खाजगी कारणावरून भांडण सुरु झाले होते. त्या दोघांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या व्यापारी युवकास त्यापैकी एकाने चाकूने वार करून गंभीर जखमी केले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा हिमायतनगर शहरात भरदिवसा चाकूने भोसकून खुनाचा प्रयत्न झाल्याची एकच चर्चा सुरु आहे. कारण हिमायतनगर शहरात मागील ४ महिन्यात चाकू हल्ल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. आजच्या घटनेत प्रशांत उर्फ भाऊ अनंतराव देवकते असे गंभीर झालेल्या युवकाचे नाव आहे.

 याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दि.२० रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास हिमायतनगर शहरातील दोन युवकांचा काहीतरी खाजगी कारणावरून बसस्थानक परिसरातील मुख्य ठिकाणी वाद झाला. या वाद्यांचे पर्यवसान भांडणात होऊ लागल्याने सदरचे भांडण सोडविण्यासाठी येथील सुरभी कोल्ड्रिंक्सचे मालक भाऊ उर्फ प्रशांत देवकते हा गेला. दरम्यान त्यांचा वाद वाढतच त्यापैकी एकाने आपल्या खिश्यातुन खंजर काढून मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान वाद सोडविण्यासाठी गेलेल्या प्रशांतच्या गेल्यानं चाकूचा गंभीर घाव झाला. 

या भयानक घटनेनंतर गंभीर जखमी झालेला युवक प्रशांत उर्फ भाऊ अनंतराव देवकते यास त्यांचे मित्रमंडळ ज्ञानेश्वर शिंदे, राजू भुरके, विकास नरवाडे यांनी तातडीने नांदेडला हलविले. आणि जखमी प्रशांतवर नांदेडच्या भगवती रुग्णालयात उपचार सुरु केले आहेत. या संदर्भात पोलिसांनी त्या आरोपी युवकास त्याच्या घरात घुसून ताब्यात घेतले असून, त्याच्याजवळून तो खंजरही जप्त करण्यात आला आहे. सायंकाळी पोलिसांनी बसस्थानक परिसरात या घटनेचा तपास सुरु केला असून, यासाठी स्वतः पोलीस निरीक्षक जायमोक्यावर जाऊन विचारपूस करत आहेत. या घटनेच्या तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी, बालाजी महाजन, जमादार सिंगणवाड, नागरगोजे यांचा समावेश आहे.


वृत्त लिहीपर्यंत हिमायतनगर पोलीस डायरीत या चाकू हल्ल्याच्या घटनेबाबत कोणतीहि नोंद झाली नव्हती. घटनेची वार्ता शहरात पसरल्याने नागरीकातून या घटनेबाबत निषेध व्यक्त केला जात आहे. हिमायतनगर शहरात मागील ४ महिन्यात हि तिसरी दिवस ढवळ्या चाकू हल्ला करण्याची घटना असून, अश्या घटनांना  आवर घालण्यासाठी पोलिसांनी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लवकरात लवकर बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा. अशी मागणी आजच्या घटनेनंतर सोशल मीडियावरून जोरदारपणे सुरु आहे. 

आज घडलेल्या घटनेमुळे हिमायतनगर शहर तर वितर्क लढविले जात असून, हिमायतनगर शहर गुन्हेगारीचा अड्डा बनतोय कि काय..? असा प्रश्न शहरातील सुजाण नागरीकातून विचारला जात आहे. यामुळे हिमायतनगरात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, पोलिसांनी ठोस पाऊले उचलावी आणि हत्यार बाळगण्यास युवकांना मनाई करून किरकोळ कारणावरून वाद-विवाद होणार नाही. यासाठी जनजागृती करावी आणि पोलिसांचा धाक काय असतो हे गुन्हेगारांना समजून यायला हवा असे जाणकार नागरीकातून बोलले जात आहे.

 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी