नांदेड| पंचायत समिती नांदेड येथे कार्यरत असलेले सहायक लेखाधिकारी श्री दिनेश नंदलाल सारस्वत यांचा,सह्पत्निक सत्कार करून पुढील आयुष्यास शुभेच्या देण्यात आले.
श्री दिनेश सारस्वत, नियत व योमानानुसार वयाच्या ५८ व्या वर्ष पूर्ण झाल्याने प्रदीर्घ काळ सेवा बजावून सेवानिवृत्त झाले त्यानिमितीने त्यांना पंचायत समितीच्या वतीने निरोप समारंभ आयोजित करून निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प.स. सभापती श्री. सुखदेव जाधव, सभापती प्रतिनिधी श्री.बबनराव वाघमारे, प.स.उपसभापती अड. राजू ग्यानोजी हाटकर,प.स.सदस्य श्री.प्रभू पाटील इंगळे,प.स. सदस्या प्रतिनिधी श्री.फहीम शेख,बालाजीराव सूर्यवंशी,
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष श्री.बाबुराव पुजरवाड, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन चे जिल्हाधक्ष श्री.धनंजय वडजे,संजय रामोड यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी (सां.) श्री. डी.के.अडेराघो, तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी (पं.) श्री.गोविंदराव मांजरमकर यांनी मानले, या कार्यक्रमास पंचायत समितीचे अधिकारी /कर्मचारी उपस्थितीत होते.