किवळा येथील कुस्ती दंगल मध्ये अनेक नामवंत पहेलवांनाचा सहभाग -NNL

 कुस्ती अच्युत टरके यांनी जिंकली

नवीन नांदेड। किवळा येथील हजरत शाहुसेन मस्तान साहेब दर्गा ऊरस शरीफ निमित्ताने आयोजित कुस्ती दंगल मध्ये महाराष्ट्रातील नामवंत पहेलवांनानी सहभाग नोंदविला,या मानाच्या कुस्तीची सुरूवात युवा नेते प्रविण म्हणून पाटील चिखलीकर व  गावकरी मंडळी यांच्या ऊपसिथीत करण्यात आली.
   
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी  31जानेवारी रोजी हजरत शाह हुसेन मस्तान साहेब दर्गा किवळा ऊरूस शरीफ निमित्ताने रूद्रगिर गुरू दयाळ गिर महाराज मठ संस्थान, ग्रामपंचायत कार्यालय , तंटामुक्त समिती , सेवा सहकारी सोसायटी व समस्त गावकरी मंडळी किवळा यांच्या वतीने कुस्ती दंगल आयोजन 31जानेवारी रोजी करण्यात आले होते, यावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्हा यातुन व तालुक्यातील नामवंत पहेलवांनानी सहभाग नोंदविला होता.
   
या कुस्ती दंगलची मानाची कुस्ती युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर यांनी प्रशांत काकांडीकर व दिंगबर बळेगाव यांच्यी लावण्यात आली.पंच म्हणून मल्हार केसरी अच्युत पहेलवान, निरंजन टरके,जगन्नाथ टरके,राजु टरके,वैभव जाधव यांनी काम पाहिले,तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती लोहा सभापती आनंदराव पाटील शिंदे, उपसभापती नरेंद्र गायकवाड,सुधाकर टाक,हारी किशन लोहीया,गट विकास अधिकारी शैलेश वावळे, विस्तार अधिकारी धनंजय देशपांडे, कुलकर्णी, लक्ष्मणराव बोडके,औसाजी कांबळे, संरपच संदीप देशमुख टेळकी,विनायक काळे वडगाव,भिमराव लामदाडे टाकळगाव , उध्दव खरबीकर, यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीत होती.
  
 शेवटची कुस्ती पाच हजार रुपये ची पहेलवान ..अच्युत दिगंबर टरके व ज्ञानेश्वर होटबेरे हिंगोली यांच्यात लढत झाली वअच्युत दिगंबर टरके हे विजयी झाले तर शंभर ते तिनं हजार रुपये पर्यंतचा अनेक कुस्ती लावण्यात आल्या होत्या.यात विविध जिल्ह्यांतील नामवंत पहेलवांनानी आखाडा गाजवुन व डावपेच आखात कुस्त्या जिंकल्या. यात्रा कमेटीचे गुरू रूद्रगिर महाराज, शंकर ढगे,केशव पाटील टरके उपसरपंच, मुस्तफा पठाण,व्यंकटी टरके,साईनाथ पाटील मुरलीधर ढगे,दत्ता नाना टरके अशोक पाटिल टरके, विठ्ठलराव किवळेकर, शाम अंभुरे,दिंगाबर नागमपलले,ग्राम विकास अधिकारी अमृत शिंदे यांच्या सह गावकरी मंडळी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी