नांदेड, आनंदा बोकारे| भारत सरकार द्वारे स्थापित (HPCL) कंपनीद्वारे प्रमाणित, " कृष्णा एच पी गॅस एजन्सी, रहाटी बु. यांच्या तर्फे...... प्रधानमंत्री उज़्वला योजनेअंतर्गत पंधरा दिवसापासून रहाटी-नाळेश्वर परिसरातील जवळ - जवळ १८ गावामध्ये ३९९ उज्वला गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले व येत्या आठ दिवसांत २२६ गॅस कनेक्शन वाटप करण्यात येणार असल्याचे एजन्सीच्या वितरक सौ. पुजा राम मुसांडे यांनी सांगितले.
त्यांच्याच खांद्याला खांदा लावून एक जबाबदार वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले, सामाजिक चळवळीची जाण असलेला वडिलोपार्जित वारसा, पुढे घेऊन जाण्याचा मानस मनामध्ये ठेऊन भविष्यात वाटचाल करणारे…. आदरणीय डॉ. राम माधवरावजी मुसांडे साहेब यांच्या अथक परिश्रमांमुळेच, आजपर्यंत उपेक्षित वंचित राहिलेल्या गरजू महिलांना फक्त १०० रुपयात गॅस कनेक्शन देणे शक्य झाले आहे , हि एक अभिमानास्पद बाब आहे.
येत्या वर्षभरात रहाटी - नाळेश्वर - वाघी तसेच लिंबगाव परिसरातील जवळ-जवळ २९ गावात घरोघर (HPCL) कंपनीचे गॅस कनेक्शन व तत्पर सिलेंडरची घरपोच सेवा देऊन , धूरमुक्त गाव व निसर्गरम्य असे नैसर्गिक वातावरण तयार करण्याचा संकल्प एजन्सीच्या वितरकांनी केला. एजन्सी तर्फे घरपोच सिलेंडर सेवा व १०० रुपयात गॅस कनेक्शन दिल्यामुळे या भागातील नागरिक विशेषतः महिला वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. अवघ्या चार महिन्यात एजन्सीने अभूतपूर्व व प्रशंसनीय असे यश संपादन केल्यामुळे मा. वितरकांचे व कर्मचाऱ्यांचे प्रत्येक गावातील नागरिक तन-मन-धनाने आभार व्यक्त करतांना दिसुन येत आहेत.
याप्रसंगी रहाटी बु. येथील तडफदार व दुर द्रष्टी असलेले व्यक्तिमत्व मा. विद्यमान सरपंच डॉ. दिपाली दुधगिरी ( लांडगे ) डॉ. सिद्धार्थ लांडगे, तसेच गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, बाळू पुंडलिक बोकारे विद्यमान उप-सरपंच, पढरीनाथ बोकारे ( माजी सरपंच ), शंकर पाटील बोकरे, केशव पाटील बोकरे, किशनराव खरबे , हरिभाऊ बोकारे, किशनराव खरबे, बाबुराव खरबे, काशिनाथ बोकारे (माजी चेअरमन ), गजानन बोकारे ( माजी उप-सरपंच ), दत्तराम बोकारे ( पहेलवान ), लोभाजी इंगोले, केश्वराव बोकारे, शंकरराव बोकारे, माधवराव बोकारे संजय बोकारे,राजू बोकारे, बालाजी कोल्हे , बळीराम खरबे , ज्ञानेश्वर जाधव,जगन्नाथ बोकारे, नामदेव खरबे, अंकुश बोकारे, संभाजी बोकारे ( गब्बू पाटील ), कामाजी वाटोरे, भोजराज काबोकारे , साहेबराव गोडबोले, मिलिंद नितनवरे व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.