शिवाजी महाराजांनी 16 व्या वर्षी स्वराज्याची संकल्पना करून स्वातंत्र्य मिळवून दिल - सिंधू दीदी


हिमायतनगर,अनिल मादसवार| छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस म्हणजे सोन्या सारखा आहे. दि. 19 फेब्रवारी 1630 मध्ये जिजाऊ मातेन एका सिंहाला सोनेरी किल्ल्यावर जन्म दिला. जीजाउ मातेने शिवबा जन्माला येण्या आधी शिवा देवीसमोर वचन घेतल होत. पुत्र जन्माला आला तर हिंदुस्थानातील आई- बहिनीची रक्षा करणारा शूर वीर होईल आणि पुञी जन्मली तर अनेक असुराचां नाश करेल अस वरदान देवीला मागीतल होत. शिवाजी महाराजांनी वयाच्या 16 व्या वर्षी स्वराज्याची संकल्पना केली. अनेक दिन दुबळ्यांची सेवा करुन माता महिलानां स्वंतत्रा मिळवून दिले. असे विचार ब्रह्माकुमारीजच्या सिंधू दीदी यांनी मांडले.

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्याकडुन दि.19 फेब्रवारी रोजी छञपती शिवाजी नगर मध्ये सर्व महिला मंडळींच्या उपस्थितीत शिवजंयती साजरी करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेची पुजा करुन छत्रपती शिवाजी महाराज्याच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत नमन करण्यात आले. या ठिकाणी छत्रपती शिवाजी नगर मधील महिला उपस्थित होत्या. यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, हिंदुस्थानात असा एकच राजा आहे कि...ज्यांनी स्वराज्य स्थापन केले. आणि त्यास स्वताचे नाव दिले नाही नाहीतर आजच्या काळात आपण थोड करतो आणि स्वताचे नाव देतो. शिवाजी महाराजानी वयाच्या 50 वर्षात 110 किल्ले बांधले आपण तर एक घर बांधू शकत नाही. त्यामुळे आजच्या युगात आपण सर्व महिलांनी एकच संकल्प करावा कि पुत्र जन्माला आला तर त्यास माँ जिजाऊंसारखी शिकवण द्यावी. आणि शिवाजी महाराज सारखे आचार - विचार त्याच्या मनात रुजवावे असेही त्या म्हणाल्या.  


यावेळी उपस्थित महिलांचा स्वागत सत्कार करण्यात आला. त्यापैकी काहींनी महिलांनी जिजा मातेचे वेषभूशा धारण करून जिजाऊ मातेच्या कर्तृत्वाचे गुणगान करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची गौरवगाथा सांगितली. तर सौ.शिलाताई पैलवाड यांनी आपले मनोगत मांडताना जिजाऊ मातेने  शिवाजी महाराजांना हिंदू धर्माचा वसा चालवण्याची जे सामर्थ संस्कार दिले. तसेच संस्कार, पालन, पोशन सर्व महिलांनी आपल्या पल्य्यांना द्यावी. असे संस्कार आपल्या लेकरांना दीले तर या काळातल्या आपण जिजाऊ माता होऊ शकतो. आपल्या मध्ये जशी एकता आहे तशी आपल्या लेकरामध्ये घडवून अनु शकतो. रोज प्रत्येकांनी आपल्या लेकरांना छत्रपती शिवाजी महाराजा बदल सांगुन त्यांचे विचार रुजविण्या बरोबर महाराजांच्या पावला वर पाऊल ठेवून चालावायला शीकु शकतो. त्यामुळे आज आपण असा संकल्प करूया कि, आपण आजच्या जिजाऊ आहोत आपण आपल्या मुलाला शिवाजी महाराजसारखं घडवायच अशी अपेक्षा व्यक्त केली.

कु अपूर्वा यां मुलीनी शिवाजी महाराजा बदल आपले मनोगत मांडले. प्रथम शिवाजी महाराज्यांच्यां प्रतिमेला मानाचा मुजरा घातला त्यानंतर जंगदब... जंगदब... ना चिंता ना... भिती ज्यांच्या राजे... शिवछत्रपती.... असंख्य झाले या जगवरी पण शिवबा सारखा न राजा झाला.... या महाराष्टाला एकतो राजा छत्रपती झाला.... रयतेचा राजा.... शेतकर्याचा राजा... मावळ्यांचा बहुंजनाचा राजा.... ते म्हणजे फक्त शिवाजी महाराज. ज्या वयांत आपण खेळतो.. बांगडतो.. त्या वयात त्यांनी मुठभर मावळ्यानां एकत्र करून आभाळ भरून शोर्य गाजवले. आपण शिवजंयती साजरी करतो... मिरणुक काढतो... गाजा वाज्या करतो... भाषण करतो... ही खरी शिवजंयती नाही. शिवरायांचे शिक्षण आपल्या तना मनामध्ये आनुन आयुष्याभर वागणे हीच खरी शिवजंयती आहे. आपण विद्यार्थ्यांनी तरुणांनी आपले ध्येयातुन राजांना अपेक्षित ठेवून आपल्या राजांना हातभर लावायचा हीच खरी शिवजंयती असल्याचे म्हंटले.

यावेळी कु. आनंदी कदम या मुलीनी पोवाडा सादर केला, सौ.अर्चना भोयर यांनी जिजाऊ मातेचे वेश धारण करून सर्वांचे लक्ष वेधले होते. यावेळी शिवजस्न्मोत्सव सोहळ्यास रेल्वे स्थानक परिसर,छत्रपती शिवाजी नगर मंदिल महिवाल, मुली मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या होता.


  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी