नवीन नांदेड| महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दि. २० फेब्रुवारी ते ११ मार्च दरम्यान बाल नाट्य प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आसून सिडको येथे ज्येष्ठ रंगकर्मी व बाल नाट्य प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत रविवार (दि.२०) रोजी प्रशिक्षण शिबिराची सुरुवात करण्यात आली.
बाल नाट्य प्रशिक्षण शिबीराच्या उदघाटन प्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी तथा नाट्य दिग्दर्शक राजीव किवळेकर, ज्येष्ठ नेप्पथयकार लक्ष्मण संगेवार, दक्षिण विधानसभा युवक काँग्रेस महासचिव एँड. प्रसेनजित वाघमारे, नांदेड शहर काँग्रेस कमिटी सचिव बापूसाहेब पाटील, सिडको पत्रकार संघाचे अध्यक्ष संग्राम मोरे, प्रा. मधुकर गायकवाड आदींची विशेष उपस्थिती होती. या २० दिवशीय शिबीरास रंगकर्मी अक्षय फुलझळके बीड, रंगकर्मी राहुल जोंधळे नांदेड, रंगकर्मी दिनेश कवडे नांदेड, जेष्ठ रंगकर्मी नाथा चितळे नांदेड, ज्येष्ठ लेखक दिग्दर्शक आणि प्राध्यापक डॉ. कैलास पोपुलवाड नांदेड.
अभिनेता आणि दिग्दर्शक रतन सोमवारे, अभिनेता आणि दिग्दर्शक रत्नदीप वावळे औरंगाबाद, रंगकर्मी स्वाती देशपांडे नांदेड, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रा. डॉ.असलम शेख औरंगाबाद, दिग्दर्शक अभिनेते रुपेश परतवाघ औरंगाबाद, रंगकर्मी रावबा गजमल औरंगाबाद, आदीसह इतर मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. बालकांना या शिबिरात अभिनय, दिग्दर्शन, संगीत, स्पीच, बॉडी लँग्वेज, योगा, अशा वेगवेगळ्या घटकांवर मार्गदर्शन मिळणार आहे. प्रशिक्षण उद्घाटन प्रसंगी बाल प्रशिक्षणार्थी सह पालक उपस्थित होते. शिबिराच्या समारोप प्रसंगी शिबिरार्थींकडून काही लघुनाटिका, स्किट, माइम, काही छोटे छोटे मोनोलॉग सादर करण्यात येणार आहे. अशी माहिती शिबीर संचालक रावबा गजमल, समन्वयक दशरत साळुंखे, अभिजित वाघमारे आदींनी दिली आहे.