विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री सुधाकरराव तेलंग यांचा केंब्रिज कनिष्ठ महाविद्यालयात सत्कार -NNL

मुखेड, दादाराव आगलावे। महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ लातूर बोर्डाचे विभागीय सचिव तथा अध्यक्ष सुधाकर तेलंग  यांची केंब्रिज कनिष्ठ महाविद्यालय औसा रोड लातूर येथे सदिच्छा भेट दिली असता त्यांचा कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

विभागीय शिक्षण मंडळ लातूर बोर्डाचे सचिव तथा अध्यक्ष माननीय सुधाकर तेलंग यांना केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत मानीत विश्वविद्यालय असलेल्या नवी दिल्ली येथील राष्ट्रीय शैक्षणिक योजना प्रशिक्षण संस्थेच्या वतीने दिला जाणारा शैक्षणिक वर्ष 2019_ 20 मध्ये तात्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सांगली येथे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्यामुळे सदरील उपकरणाची दखल घेऊन एन. आय.  ई .पी.ए. या केंद्राच्या संस्थेने  श्री सुधाकर तेलंग यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

        

सदरील पुरस्कार माननीय सुधाकर तेलंग यांना दिनांक 10 फेब्रुवारी गुरुवार दुपारी तीन वाजता केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार मिळालेल्या मध्ये राज्यातील सहा अधिकार्‍याचा समावेश आहे. त्यापैकी एक सुधाकर तेलंग आहेत माननीय सुधाकर तेलंग हे 2019_ 20 मध्ये केलेल्या कार्य कार्यामुळे यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. 


ते त्या काळात जिल्हा परिषद सांगली येथे माध्यमिक शिक्षण अधिकारी म्हणून काम केले तेव्हा तेथे कार्यरत असताना अधिकारी आपल्या दारी शिक्षक_ दरबारी हा उपक्रम राबविला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कडून गुगल लिंक द्वारे प्रलंबित प्रश्न एकत्रित करून संबंधित संचिका तालुका ठिकाणी नेऊन जाग्यावर निर्णय देण्याचे काम त्यांनी केले त्यासोबत करोणाच्या लाटे पूर्वी दहा हजार विद्यार्थ्यांना एकत्रित सूर्यग्रहणाचे दर्शन घडवले. माननीय सुधाकर तेलंग ज्या खुर्चीत बसतात त्या खुर्चीला न्याय देऊन सर्वसामान्याचे काम सुलभ होईल हेच पाहत असतात. 

माननीय सुधाकर तेलंग विभागीय शिक्षण मंडळात रूजू झाल्यानंतर बरेचसे नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले त्यापैकी बोर्ड आपल्या घरा गुणपत्र दुरुस्त करा हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून बोर्डाचे कर्मचारी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन गुणपत्रक व नावे दुरुस्ती करण्याचे काम केले आहे. असे नाविन्यपूर्ण उपक्रम करून प्रशासन आपल्या दारी देण्याचे काम माननीय सुधाकर तेलंग साहेब करीत आहेत. म्हणून त्याच्या कार्याची दखल घेऊन सदरील पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे. 


अशा या  उपक्रमशील कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी माननीय सुधाकर तेलंग यांचा सत्कार अमरदीप बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लातूर संचलित. केंब्रिज कनिष्ठ महाविद्यालय औसा रोड लातूर येथे संस्थेचे संस्थापक सचिव तथा महाराष्ट्र राज्य स्वयं अर्थ सहित संस्थाचालक  संघटनेचे सचिव प्रा. सतीश मारकोळे पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ व बुके देऊन करण्यात आला त्या समयी संस्थेचे उपाध्यक्ष भारत भाऊ व स्वय अर्थसहाय्य संस्थाचालक संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रा. निवृत्ती लोमटे प्राचार्य देवकते डी. एन. प्रा. उमाकांत साळुंके उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी