उस्माननगर, माणिक भिसे। माता रमाईच्या त्यागामुळे आपण समाजात सुखी-समाधानी जीवन जगत आहोत त्यामुळे रमामातेचा महीलांनी आदर्श घ्यावा असे प्रतिपादन भीमाशंकर महाविद्यालय विद्यालयाचे प्रा.विजय भिसे यांनी मनोगत व्यक्त केले आहे.
मौजे शिराढोण ता.कंधार येथे भारतीय घटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना प्रतेक संघर्षात साथ देणा-या , आयुष्यभर त्यांची सावली बनून राहणाऱ्या तसेच नऊ कोटी जनतेच्या माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महामाता त्यागमुर्ती रमाई भिमराव आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रथम महाकारोनीक तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजन व पुष्पहार अर्पण करून पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण आयु.रेखाताई विजय पंडीत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेखाताई विजय पंडित हया होत्या तर प्रमुख वक्ते म्हणून सुजाता आढाव, प्रियंका ताई गायकवाड,व अतूलराज बेळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.विजय भिसे , अशोक गिते,दिंगबर भिसे, आशाताई चिंतोरे यांची उपस्थिती होती.
माता रमाई आंबेडकर जयंती दिनाचे औचित्य साधून दि.६फेब्रूवारी २०२२ रोजी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस देऊन जयंती दिनी गौरविण्यात आले .तसेच प्रथम, व्दितीय, विद्यार्थ्यांचाही शालेय साहित्य वाटप करुन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना प्रा.विजय भिसे म्हणाले की,माता रमाईच्या त्यागामुळे आपण समाजात सुखी-समाधानी जीवन जगत आहोत.त्यामुळे आपल्या जिवनाचे सार्थक झाले,माता रमाई आंबेडकर यांचा आदर्श महीलांनी घ्यावाअसे प्रतिपादन केले.
यानंतर प्रियंका ताई गायकवाड, सुजाता आढाव, यांनी पण माता रमाई आंबेडकर यांच्या जिवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा रेखाताई विजय पंडित यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमांचे सुत्रसंचलन - मनोज जमदाडे व कांचन शेषेराव जमदाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनील जमदाडे शिराढोण कर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल संजय जमदाडे, प्रबुद्ध राक्षसे , मंगेश राक्षसे ,स्वप्ननिल भाऊराव जमदाडे, युवराज राक्षसे व महिला मंडळाने परिश्रम घेतले आणि सायंकाळी कार्यक्रमाची सांगता झाली.