नांदेड| सामाजिक कार्यकर्त्या तथा होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज नांदेडच्या अध्यक्षा डॉ.शीतल भालके यांना जिजाऊ सवित्री रत्न पुरस्काराने नुकतेच नांदेड येथे सन्मानित करण्यात आले.
जिजाऊ सावित्री जयंती महोत्सवानिमित्त दैनिक यूवा राज्य व आझाद ग्रुप च्या वतीने जिजाऊ सावित्री जयतींचा उत्सवामध्ये कर्तुत्तवान महिलांचे लेख प्रकाशित करण्यात येऊन अशा महिलांना जिजाऊ सवित्री रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. यामध्ये डॉ.शीतल भालके यांचा समावेश होता. रविवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी नांदेड येथे एका सोहळ्यामध्ये हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला.
नांदेड येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.मंगाराणीताई अंबुलगेकर, नांदेडच्या महापौर सौ.जयश्रीताई पावडे, माजी नगराध्यक्ष सौ.आशाताई चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ. रेखाताई कळम पाटील, सौ.ऋतुजा शिंदे सौ.ज्योती कापसे आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. हंसराज वैद्य सुप्रसिद्ध बाल रोग तज्ञ, ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक देविदास फुलारी, गंगाखेडचे सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ मुरकुटे, इंजी.शिवाजीराव पाटील, प्रमोद टाले, आझाद ग्रुपचे प्रदेश प्रमुख भीमाशंकर कापसे, पोलिस निरीक्षक काकडे, ज्योती शिंदे, श्री पौळसर, इत्यादि प्रमुख अतिथीची उपस्थिती होती. या कार्यक्रमास दैनिक युवराज्य चे संपादक अजित पाटील. कार्यकारी उप संपादक गणेश पाटील शिंदे, श्याम जाधव, ऋतुजा शिंदे इत्यादींनी परिश्रम घेतले. पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ.शीतल भालके यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.