आ. बालाजी कल्याणकर यांनी केली विकास कामांची पाहणी
नांदेड, आनंदा बोकारे। उत्तर मतदारसंघात आ. बालाजी कल्याणकर यांची अनेक विकास कामे प्रगतीपथावर आहेत. सध्या थुगाव ते सुगाव, सुगाव ते वाघी, सुगाव ते रेल्वे पट्टरी या तिन्ही महत्त्वांच्या रस्त्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. याची पाहणी आ.बालाजी कल्याणकर यांनी केली असून संबंधित विभागांना या कामांबाबत सूचना देखील केल्या आहेत. यावेळी आ. बालाजी कल्याणकर यांच्या सोबत परिसरातील शेतकरी, गांवकरी, युवावर्ग, ज्येष्ठ नागरिक तसेच आजी - माजी पदाधिकारी देखील उपस्थित होते.
नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांचा विकास कामाचा मतदारसंघात धडाका सुरू आहे. वेगवेगळ्या योजनेतून विविध विकास कामे ते करून घेत आहेत. अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या रस्त्यांना निधी देऊन, त्या रस्त्यांचे कामे करून घेत आहेत. यामुळे अनेक वर्षापासून अडगळीत पडलेली विकासकामे प्राधान्याने आ. बालाजी कल्याणकर करत आहेत. त्यामुळे मतदारसंघात आ. बालाजी कल्याणकर यांच्या प्रती नागरिकांतून समाधान व्यक्त केल्या जात आहे.शुक्रवारी व शनिवारी आ. बालाजी कल्याणकर यांनी थुगाव ते सुगाव रस्त्याची पाहणी केली. या रस्त्याचे काम देखील प्रगतिपथावर आहे. त्याबरोबरच सुगाव ते वाघी हा रस्ता शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेला होता. रस्त्याचे काम देखील प्रगतिपथावर सुरू आहे, याची पाहणी आ. बालाजी कल्याणकर यांनी केली. तसेच सुगाव ते रेल्वे पट्टरी या रस्त्याच्या कामाची पाहणी केली आहे. यावेळी परिसरातील नागरिकांनी आ. बालाजी कल्याणकर यांचे आभार मानले आहेत.