लोहा| मोबाईल मुळे वाचनाकडे मोठे दुर्लक्ष झाले. सोशल मीडियावर अधिकच वेळ दिला जातो आहे. असा आव्हानात्मक काळात तरुण नेतृत्व माजी सरपंच अमोल पाटील ढगे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पिंपळगाव ढगे या गावात चि. पांडुरंग यांच्या नावाने "वाचन कट्टा" सुरू करण्यात आला आहे. लोह्याचे संवेदनशील पोलीस निरीक्षक संतोष तांबे यांच्या हस्ते या वाचनालयाचा शुभारंभ करण्यात आला.
लोहा शहराच्या जवळ असलेल्या पिंगळगाव ढगे या गावात भाई संभाजी पाटील-ढगे सार्वजनिक वाचनालय आहे त्याच्या अंतर्गत वाचन गोडी लागावी यासाठी माजी सरपंच अमोल पाटील ढगे यांच्या पुढाकाराने चि.पांडुरंग "वाचन कट्टा शिवजयंती च्या निमित्ताने सुरू करण्यात आला.
लोह्याचे पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांच्या हस्ते उदघाटन झाले वाचनालयचे अध्यक्ष व चेअरमन भाई किशनराव पाटील-ढगे गावचे सरपंच गणेशराव पा. ढगे, शालेय समितीचे अध्यक्ष श्री बालाजी पा ढगे, यांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन गोविंद कोठे केले. या कार्यक्रमासाठी भगवानराव पा ढगे, बापुराव पा ढगे, रेशमीजी पाटील, गोपाळ कौशल्य,गंगाधर काकडे,भिवाजी ढगे,अंकुश ढगे,ज्ञानेश्वर ढगे, चिंतामणी ढगे,वाचनालये सचिव व संयोजक अमोल पाटील-ढगे आभार मानले ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.