लोहा| शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले शिवरायांना अभिवादन केल्या नंतर तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनीं खिचडीचा स्वाद घेतला.शहरात शिवजयंती महोत्सव मोठ्या हर्षोउल्हास साजरा करण्यात आला. पोलीस ठाण्या समोर शाहरुख शेख, दिनेश पवार, अजय भिसे व मित्र परिवार यांनी खिचडी वाटप ठेवले होते.
तहसीलदार यांना महापुरुषांच्या जयंती सोहळ्यात विशेष दक्षता घ्यावी लागते. सामाजिक एकोपा व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी संबंधित यंत्रणेला आदेशित करावे लागते व स्वतः लक्ष ठेवून असतात.तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे कार्य तत्पर अधिकारी .शिवाय संवेदनशील मनाचे अधिकारी.तहसील कार्यालयात शिवजयंती साजरी केल्या नंतर ते शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरले. शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
त्यानंतर पोलीस ठाण्या समोरील खिचडी वाटप ठिकाणी त्यांना कार्यकर्त्यानी आग्रहपूर्वक बोलावले. त्यांच्या सोबत माधव काकडे होते.तहसीलदार मुंडे यांनी खिचडीचा आस्वाद घेतला. एवढे मोठे अधिकारी असूनही त्यांचे साधेपण अनेकांना भावले....तहसीलदार साहेबांनी खिचडी चा स्वाद घेतला याचे मोठेपण या अन्नदान करणाऱ्या संयोजकांना वाटले. तहसीलदार मुंडे यांच्या मनाचा मोठेपणा मात्र सर्वाना भावला त्याच्या खिचडी आस्वादाची सगळीकडे चर्चा सुरू होती