भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते ती म्हणजे साध्या भाषेत कलेक्टरची परीक्षा (आय.ए.एस.) या परीक्षेची भारतातील मक्का किंवा काशी म्हणजे दिल्ली. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांची दिल्लीत कायमच गजबजते असते. येथे अत्यंत व्यावसायिक पद्धतीने प्रशिक्षण, चाचणी परीक्षा, मुलाखतीची तयारी हे सर्व चालते. आय. ए. एस. अधिकारी घडवणे हे शिक्षण क्षेत्रातील एव्हरेस्ट आहे असे समजू. या सर्वात माझा महाराष्ट्र कुठे आहे?
मंगल दिनी, मंगल क्षण - दिल्लीच्या राजेंद्रनगर या हृदयात हा कार्यक्रम घडून आला. इन्फिनिटीतर्फे गिरीश खेडकर व ऋतुराज काळे यांनी त्याचे आयोजन केले होते. उद्घाटन झाले दीपक शिंदे (IAS) यांच्या हस्ते ते दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरचे सचिव आहेत. दुसरे खास पाहुणे होते. अमित भोळे जे नागरी लेखा अधिकारी (ICAS) म्हणून दिल्लीत काम करतात. या मराठी अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा भारताच्या राजधानीत उमटवला आहे.
दीपक शिंदे यांनी खुप सोप्या शब्दात त्यांच्या यशाचे रहस्य सांगितले. त्यांनी अभ्यास करताना अभ्यासक्रमाची चौकट समजून घेतली. भूषण देशमुख सर यांचे तपशीलवार मार्गदर्शन घेतले. त्यातून त्यांनी यशचा जरीपटका रोवला.
आजी सोनियाचा दीनु - शिंदे यांनी प्रतिपादन केले की, मराठी माणूस आजपर्यंत दिल्लीत सातत्य दाखवू शकला नाही ही खंत आहे. पण आजच्या या कार्यक्रमाने या विश्वास वाटतो की इन्फिनिटी ते सातत्य दाखवेल. या पुढचा कार्यक्रम आपण यशस्वी अधिकाऱ्यांचे सत्कार हाच करू. अमित भोळे यांनी समतोल आणि वेळेचे नियोजन याचे महत्त्व सांगितले. गिरीश खेडकर यांनी निश्चय व्यक्त केला की जसा दर्जेदार कामगिरीने आम्ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन केला, तोच विश्वास आम्ही दिल्लीत निर्माण करू. दिल्लीत रोवलेले निशाण हा अखिल भारतीय पसरण्याचा राजमार्ग ठरेल.
यावेळी सचिन कदम सर, अजिंक्य राजपूत सर, निखिल शेठ सर, संजीव कबीर सर यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. मृणालिनी सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आता यापुढे ही घोडदौड अशीच चालत राहिल.