हिमायतनगर, माहूर येथे पक्के अनुज्ञप्ती चाचणी शिबीर; कोरोना लस प्रमाणपत्र आवश्यक -NNL


नांदेड|
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने मार्च 2022 मध्ये हिमायतनगर येथे 16 मार्च व माहूर येथे 22 मार्च 2022 रोजी पक्के अनुज्ञप्ती चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

या दिनांकामध्ये स्थानिक सुट्टी जाहीर झाल्यास अथवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास शिबिराच्या तारखेत बदल होऊ शकतो. या शिबिरासाठी 2 मार्च 2022 रोजी कार्यालयीन वेळेत अपॉटमेंट खुल्या होतील. सर्व अर्जदारांनी उपलब्ध अपॉईंटमेंट घेऊन कोरोना लस घेतल्याचे प्रमाणपत्रासह शिबिरास उपस्थित राहावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी