संध्याताई बालाजी कल्याणकर यांचा स्तुत्य उपक्रम
नांदेड,आनंदा बोकारे। शिवजयंती व स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शिवसृष्टी प्रतिष्ठान तरोडा (खु.) च्या वतीने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले ही संकल्पना नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांच्या पत्नी तथा शिवसृष्टी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संध्याताई बालाजी कल्याणकर यांची आहे.
नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर हे आपल्या मतदार संघात वेगवेगळे उपक्रम नेहमीच राबवत असतात त्यांच्या पावलावर पाऊल टाकत संध्याताई बालाजी कल्याणकर या शिवसृष्टी प्रतिष्ठान च्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहेत शिवालय अर्बन निधी लि. गोकुळ नगर च्या सौजन्याने त्यांनी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सतरा शाळेत निबंध, चित्रकला, रांगोळी या सर्व स्पर्धा राबवल्या होत्या. या स्पर्धेत प्रत्येकी शाळेतून तीन तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती त्या विद्यार्थ्यांना जंगमवाडी येथील मनपा शाळेत बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित केला होता एकूण तीनशे विद्यार्थ्यांना यावेळी पॅड, स्कूल बॅग, वही अशा प्रकारचे शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून संध्याताई यांनी बोलताना ग्रामीण असो या शहरी भागातील प्रत्येक शाळेत मी यापुढे वेगवेगळ्या स्पर्धा राबवणार आहे त्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना याच प्रकारचे बक्षिस यापुढे देखील देणार असल्याचे बोलले आहेत.
या कार्यक्रमास संध्याताई कल्याणकर यांच्यासोबत सतरा शाळेतील मुख्याध्यापक उपस्थित होते त्यात सज्जन प्रभू, कल्पना मुळे, कल्याण साहेबराव, गाडीसान कामाजी, रेश्मा मॅडम, अन्सारी सर, आल्लमवाड मॅडम, गुलाम मुस्तफा खान, जरगर मुस्तफा, एम.सी. कांबळे ,भगत मॅडम, संजीदा मॅडम,अजीम सिद्धकि, शेख रहीम, आयीशा परवीन, श्रीकांत पवार यांच्यासह आदीजण उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल थोरात, आम्रपाली चव्हाण, नरेश देशपांडे, लक्ष्मण कल्याणकर यांच्यासह आधी जणांनी परिश्रम घेतले.