नांदेड। येथील प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. अशोक बोनगुलवार यांच्या मातोश्री सौ. प्रभावती चंद्रकांत बोनगुलवार यांचे कर्करोगाच्या आजाराने आज मंगळवारी दि. ८ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता निधन झाले. मृत्युसमयी त्या ७६ वर्षांच्या होत्या.
सौ. प्रभावती बोनगुलवार ह्या अत्यंत धार्मिक आणि मितभाषी म्हणून परिचित होत्या. महिला सक्षमीकरण व संस्कारमय पिढी निर्माण करण्यासाठी त्या सदैव प्रयत्नशील होत्या. त्याच बरोबर यासाठी त्या प्रबोधनही करीत असत. गेल्या एक वर्षापासून त्या कर्करोगाने आजारी होत्या. खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात पती चंद्रकांत बोनगुलवार. प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ तथा होमगार्डचे कंपनी नायक डॉ.अशोक बोनगुलवार, छायाचित्रकार नितीन बोनगुलवार, मनोज बोनगुलवार ही मुले, एक विवाहित कन्या डॉ.सौ. वर्षा मद्रेवार व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
साै. प्रभावती बोनगुलवार यांच्या पार्थिव देहावर रात्री गोवर्धन घाट येथील शांतीधाम स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.