नविन नांदेड। सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने २२ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांना हवामान विषयक मार्गदर्शन मेळावा पंजाबराव डख पाटील हवामान विषयक मार्गदर्शन मेळावा यांच्या सायंकाळी सहा वाजता काळेशवर कमान प्रांगण विष्णुपुरी नांदेड येथे आयोजित केले आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती विष्णुपुरी यांच्या वतीने विविध व नाविन्य पुर्ण ऊपकम आयोजित करण्यात येतात,यावर्षी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची पिंके जमिनदोस्त झाली होती तर गोदावरी नदी ला पुर आला होता,या पार्श्वभूमीवर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शेतकऱ्यांना हवामान विषयक मार्गदर्शन व्हावे यासाठी पंजाबराव डख पाटील यांच्या शेतीविषयक मार्गदर्शन मेळावा २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित केला आहे.
२३ फेब्रुवारी रोजी दुपारी तिनं वाजता गावातील मुख्य रस्त्याने पालखी मिरवणुक सोहळा आयोजित करण्यात आला असून यात ढोल ताशा पथक सह फटाक्यांच्यी अतीषबाजी करण्यात येणार असून गावातील प्रमुख मार्गावर भगवे ध्वज यासह शुभेच्छा फलक लावण्यात आले आहेत.या सोहळ्याला आ.मोहनराव हंबर्डे यांच्या सह संरपच, ग्रामपंचायत सदस्य व विविध राजकीय पक्षांच्ये पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्यी उपस्थिती राहणार आहे.
सायंकाळी सहा वाजता जाहीर शिवव्याख्यान डॉ.राजेशवर दुडकनाळे यांचे आयोजित करण्यात आले असून, यानंतर अन्नदान वाटपाचे आयोजन करण्यात आले आहे. या मार्गदर्शक मेळाव्यास व पालखी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती विष्णुपुरी चा वतीने करण्यात आले आहे.