लोह्यातील शिवस्मारकाचे काम सुरू; आ.शिंदे यांना अपुरी माहिती - उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार -NNL


लोहा|
राज्याचे  तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात लोहा शहरा साठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता पण मविआ सरकारने तो थांबविला तेव्हा पासून आजतागायत ज्यांना भरघोस मतांनी  निवडून दिले त्यांनी अडीच दोन वर्षात  निधी साठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत आणि एक छादम ही दिला नाही. शिवस्मारक खा चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली साकारले जात आहे. पाच कोटी निधी बाबत भूमिका स्पष्ट करावी. उगीच अपुऱ्या माहितीच्या आधारे काही भाष्य करू नये अशी खरमरीत टीका करीत लोह्याचे उपनगराध्यक्ष व शिवस्मारक समितीचे प्रमुख शरद पाटील पवार यांनी  काही सवाल उपस्थित केले .

 शिवजयंती दिनाच्या निमित्ताने आ श्यामसुंदर शिंदे यांनी शिवरायांच्या पुतळ्यास जर समिती त्याच्या कडे गेली तर वीस लक्ष रुपयांचा निधी देण्याची व समितीत इतर व्यक्ती घेण्याचे व परवानगी साठी काही अडचण असेल तर आपण जिल्हाधिकारी यांना बोलू असे विधान केले त्यावर लोह्याचे उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार यांनी खरमरीत टीका केली.

$ads={1}

आ श्यामसुंदर शिंदे यांना निवडून आणण्यात जिल्ह्याचे खा.प्रतापराव पाटील यांचे सगळे श्रेय व त्यानंतर आ शिंदे यांनी चिखलीकर समर्थकांच्या ताब्यातील संस्थेवर प्रशासक आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि विरोधकांशी दोस्ती करत संधी मिळेल तेथे चिखलीकर समर्थकांची कोंडी सुरू केली आहे. शहरासाठी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाच कोटींचा निधी प्रतापराव पाटील यांच्या पुढाकारामुळे दिला होता. पण मविआ सरकारने तो दिला नाही पण आ शिंदे यांनी तो लोहा नगर पालिकेला मिळावा म्हणून कोणतेही प्रयत्न केले नाहीत असे उपनगराध्यक्ष शरद पवार यांनी नमूद केले उलट असहकार धोरण ठेवले.

$ads={2}

छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या पुतळ्याची समिती झाली पुतळ्यासाठी ज्या ज्या परवानग्या लागतात त्या मिळाल्या आहेत. आ शिंदे यांनी पूर्ण माहिती घ्यायला हवी होती. शिवाय आजूबाजूच्या लोकांचा समावेश करावा असे सुचविले मूलतः ही समिती नगर पालिकेची पदसिद्ध आहे. शिवाय स्मारकाचे काम सुरू झाले तेव्हा असे भाष्य करणे अयोग्य होय.शिवाय आमच्या कडे आले तर निधी देऊ असे ठणकावून आ सांगताहेत. पण तुम्हाला या शहरातील मतदारांनी भरघोस मतदान केले शिवाय चिखलीकर समर्थक तुमच्या विजयासाठी झटले. त्याची आठवण ठेवून शहरासाठी निधी द्यायला पाहिजे शिवरायांच्या स्मारकाला निधी जाहीर केला पण आमच्याकडे मागणी केली तर निधी देऊ अशी अट टाकली म्हणजे आ. शिंदे यांनी नेमकी भूमिका जनतेला कळली आहे.

कंधार नगर पालिकेत निधी देऊन परत घेतला आता लोह्यातही अडथळा आणण्याचा हेतू आमदारांचा दिसतो आहे. शिवरायांच्या स्मारका निधीची कमतरता नाही पण आ शिंदे यांनी अपुऱ्या माहितीवर कोणतेही भाष्य करून जनतेत दिशाभूल करू नये. आधी मतदार संघात जनसंपर्क ठेवा ज्यांनी निवडणूक दिले त्याच्या गावात निधी द्या. लोह्याच्या ५ कोटींचा परत गेलेला निधी मिळवून देण्यासाठी अडीच वर्षात का प्रयत्न केले नाहीत. यासह अनेक प्रश्न शरद पाटील यांनी उपस्थित करत आ.श्यामसुंदर शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी