उस्माननगर, माणिक भिसे| येथील सिध्देश्वर शिवमंदिरात ५३ वा अखंड शिवनाम सप्ताहास श्री.संत शिरोमणी शिवयोगी मन्मथस्वामी यांच्या कृपेने व श्री गुरु १०८ ष.ब्र. सांबाशिवाचार्य महाराज, थोरला मठ वसमत ,श्री गुरु १०८ ष.ब्र.डाॅ. नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज लासीनमठ पुर्णा,श्री.गुरु १०८ ष.ब्र.रुद्रमुनी शिवाचार्य महाराज मुदखेड ,श्री गुरु १०८ ष.ब्र. वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ वसमत ,श्री.गुरु१०८ ष.ब्र.प.चंद्रशेखर शिवाचार्य महाराज माजलगावकर यांच्या प्रेरणेने दिनांक 21 फेब्रुवारी पासून प्रारंभ ते 28 फेब्रुवारी दरम्यान सप्ताहाचे आयोजन व गुरुवर्या यांच्या उपस्थितीत अमृत उपदेशाचा आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम सकाळी ५ ते ६ शिवपाठ,६ ते ७ श्री.सिध्देश्वरास अन्नदात्याकडून रुद्राभिषेक,९ ते ११ ग्रंथराज परमरहस्य पारायण,११ ते १२ प्रवचन,१२ ते ३ सकाळचा प्रसाद , सायंकाळी ४ ते ५ गाथा भजन ५ ते६ प्रवचन त्यानंतर रात्री ९ वा. शिवकिर्तन ,११ ते १२ गुरुवर्याचे प्रवचन ,आणि शिवजागर होईल. अखंड शिवनाम सप्ताह व ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळ्यात नामवंत किर्तनकार दि.२१ रोजी सोमवारी रात्री शि.भ.प.कैलास महाराज जामकर,तर दुपारी प्रवचनकर शि.भ.प. मारोतराव नेळगे महाराज,दि.२२ रोजी मंगळवारी रात्री शि.भ.प. तानाजी पाटील थोटवाडीकर तर दुपारी प्रवचनकर शि.भ.प.सौ.सत्यभामा येजगे महाराज,दि.२३ रोजी बुधवारी रात्री शि.भ.प.सौ. शिवकांताबाई पळसकर लोहा ,तर दुपारी प्रवचनकर शि.भ.प.देवजी नरवाडे महाराज, दि.२४ रोजी गुरुवारी रात्री शि.भप.लक्ष्मण विभूते गुरुजी लातूर तर दुपारी प्रवचनकर शि.भ.प. बालाजी पोटजळे महाराज,दि.२५ रोजी शुक्रवारी रात्री शि.भ.प. सौ.श्रीदेवी भीमाशंकर स्वामी कापशीकर.
दुपारी प्रवचनकर शि.भ.प. हनमंतराव नावले गुरुजी,दि.२६ रोजी शनिवारी रात्री शि.भ.प.सौ. कावेरीताई किशनराव मुतखेडे नांदेड,तर दुपारी प्रवचनकर शि.भ.प.शेशिकांत पाटील,दि.२७ रोजी रात्री शि.भ.प. शिवशरण गुरुजी रटकलरकर यांचे तर दुपारी प्रवचनकर शि.भ.प. बालाजी भोस्कर गुरुजी नायगाव यांचे( टाळ आरती) दि.२८ रोजी सोमवारी प्रसादावरील शिवकिर्तन सद्गुरु युवा संत वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ वसमत यांचे होईल. प्रसादावरील कीर्तनानंतर उपस्थित गुरुवर्यांचे आशिर्वचन होईल. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आपले जीवन कृतार्थ करून घ्यावे असे आव्हान वीरशैव समाज बांधव , गावकरी यांनी केले आहे.