महिलां बचत गटांसाठी संध्याताई कल्याणकर यांचा पुढाकार
नांदेड, आनंदा बोकारे। नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांच्या पत्नी संध्याताई बालाजी कल्याणकर यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून नांदेड उत्तर मतदारसंघात वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. महिलांना अल्पदरात तसेच हक्काचे कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी संध्याताई बालाजी कल्याणकर यांनी शिवजयंतीचे आवचीत्य साधुन शिवालय निधी अर्बन बँकेची सुरुवात केली आहे. पासदगाव येथील अशोक महाराज किरकणर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांच्या पत्नी संध्याताई बालाजी कल्याणकर या शिवालय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंतर्गत विविध उपक्रम नांदेड उत्तर मतदारसंघात राबवत असतात. महिला बचत गटांचे त्यांनी संपूर्ण मतदारसंघात जाळे उभारले आहे. याच माध्यमातून महिलांना सूक्ष्म, लघु उद्योग करण्यास साहाय्य करत असतात. उद्योग उभारण्यासाठी बँकेचे अर्थसाह्य घ्यावे लागते, त्यासाठी बँकांकडून महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही गरज लक्षात घेऊन संध्याताई बालाजी कल्याणकर यांनी शिवालय निधी अर्बन बँकेची शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सुरुवात केली आहे.
महिलांना आपल्या हक्काचे तसेच अल्प दरात कर्ज उपलब्ध व्हावे हेच ध्येय असल्याचे शुभारंभ प्रसंगी संध्याताई कल्याणकर यांनी व्यक्त केले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. नांदेड उत्तर मतदार संघातील प्रत्येक महिलेने वेगवेगळे व्यवसाय केले पाहिजे. त्यासाठी मी लागेल ते सहकार्य करण्यास तयार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.