नांदेड| तालुक्यातील गोदावरी काठी असलेल्या सोमेश्वर (जुने) येथील सोमनाथ मंदिरात उद्या दि.23 (बुधवार) फेब्रुवारी पासून श्री अखंड हरीनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
महंत 1008 जीवनदास महाराज चुडावा, महंत 1008 राम भारती महाराज मोहनपूरा यांच्या आशिर्वादाने ह.भ.प.भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर यांच्या उपस्थितीत प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी गोदावरी काठी असलेल्या सोमेश्वर (जुने) येथील सोमनाथ मंदिरात शिवलिलामृत पारायण, भागवत कथा ज्ञानयज्ञ तसेच लक्ष्मणशक्ती श्रवण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि.23 फेब्रुवारी ते 2 मार्च पर्यंत होणार्या सोहळयात पहाटे 4 ते 6 काकडा आरती, 7 ते 10 शिवलिलामृत पारायण, 11 ते 4 भागवत कथा.
सायंकाळी 4 ते 6 महाप्रसादाचे आयोजन, रात्री 7 ते 8 हरीपाठ तसेच 8 ते 10 या वेळेत भावार्थ रामायण व हरी जागर होणार आहे. या सप्ताहात भागवताचार्य श्री ह.भ.प. मधुसदन महाराज यांची भागवत कथा होणार असून दि.2 मार्च रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत ह.भ.प.रामगिरी महाराज मीरखेलकर यांचे काल्याचे किर्तन होईल. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी या सप्ताहाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पत्रकार आनंदा बोकारे यांनी केले आहे.