नांदेड| शिव जन्मोत्सव निमित्त अनेक जण अनेक उपक्रम घेतात व या उपक्रमातून शिवरायांना मानवंदना देतात पण राष्ट्रीय चित्रकार राजेश सरोदे यांनी रांगोळी व चित्राच्या माध्यमातून मानवंदना देताना स्वतःच्या रक्तातून छत्रपती शिवरायांची उत्तम अशी प्रतिमा रेखाटण्याच काम केलं.
आतापर्यंत त्याने चित्र व व्यंगचित्राच्या माध्यमातून समाजातील वास्तव मांडण्याचा काम केलं पण शिवजन्मोत्सव 2022 निमित्त स्वतःच्या रक्तातून शिवरायांचे चित्र रेखाटलं व नेत्याच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान करणाऱ्या युवकांना बाजूला सारत समाजासमोर एक आदर्श उभा केला.
कलेच्या जगातला खरा कलाकार आज छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या कलेच्या माध्यमातून वंदन करून एक कलाक्षेत्राला आणि या छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या चित्राच्या कलेतून जगासमोर ठेवतो ही एक आदर्श अशी गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेले त्यांचे प्रेम ,निष्ठा, आदर राष्ट्रीय चित्रकार राजेश सरोदे यांनी दाखवून दिलेले आहे. त्यामुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.