नांदेड| नवीन नांदेडातील शाहूनगर, वाघाळा येथील रहिवासी सरस्वतीबाई माधवराव महाबळे (वय- ७५ वर्षे) यांचे हृदय विकाराने २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर बुधवार दि. २३ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता नवीन नांदेडातील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, पाच मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी माधवराव महाबळे यांच्या 'त्या' पत्नी, आणि कराटे प्रशिक्षक शंकर महाबळे व भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा उपाध्यक्षा रेखाताई विजय पंडीत यांच्या 'त्या' मातोश्री होत.