अर्धापूर तालुक्यात सर्वत्र शिवजयंती साजरी -NNL


अर्धापूर|
तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायत कार्यालय, नगरपंचायत कार्यालय, निमशासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणावर शिवजयंती साजरी करण्यात आली.

अर्धापूर काॅग्रेस कार्यालयात तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे, शहराध्यक्ष राजेश्वर शेटे, नगराध्यक्ष छत्रपती कानोडे,सभापती अशोकराव सावंत,पंडीतराव लंगडे, सोनाजी सरोदे,मनसब शेठ,कामाजी अटकोरे,शंकर ढगे, राजाराम पवार, पंढरीनाथ क्षीरसागर,राजू गायकवाड ,धारोजी कानोडे,आगलावे यांनी शिवजयंती साजरी केली. नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्ष छत्रपती कानोडे व उपनगराध्यक्ष प्रतिनिधी मुसव्वीर खतीब व मुख्याधिकारी शैलेश फडसे, गटनेते प्र.राजेश्वर शेटे,संचालक प्रवीण देशमुख, गाजी काजी,व्यंकटी राऊत, शेख जाकेर,डॉ विशाल लंगडे,सोनाजी सरोदे,मुख्तदरखान पठाण, सलीम कुरेशी, नामदेव सरोदे व सर्व नगरसेवक यांनी तर पार्डी(म) येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात जयंती साजरी करण्यात आली.

 यावेळी सरपंच प्रतिनिधी मारोतराव देशमुख, सरपंच संघटनेचे एन बी मदने, सुरेशराव देशमुख,रुपेश देशमुख, ग्रामसेवक राम शिंदे,अमीत देशमुख,शंकर हापगुंडे, गोविंदराव देशमुख,चांदू कांबळे,गणेश शिखरे,ज्ञानेश्वर मदने, देवीदास कांबळे, गजानन हापगुंडे,कानबा पवार,प्रदुम मदने,महेश देशमुख, राजकुमार मदने, विठ्ठल मरकुंदे,सुधाकर हापगुंडे,साईनाथ डोईफोडे,राहुल मामीडवार,केवळाजी ठोंबरे,शिवा गीरी, निखील देशमुख,शिवराज बंडाळे,हरी आचलखांबे,दिपक कांबळे यांची उपस्थिती होती.पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी शिवजयंती निमित्त कायद्याचे नियमांची उपस्थितांना माहिती दिली, पत्रकार संघाने शिवजयंती निमित्त एका शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना भोई प्रतिष्ठानच्या वतीने घर देण्यात आले.शिवसेनेच्या वतीने शहराध्यक्ष सचीन येवले यांनी शहरात शिवजयंती साजरी केली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी