नांदेड| पोलीस ठाणे वजीराबाद हद्यीतील इसम नामे विरसिंध ऊर्फ विरा गुरुदेवसिंघ तिवाना वय 26 वर्षे यास जयमल ऊर्फ गग्गा रा. नांदेड यांनी खंजरने भोसकुन त्याचा खुन करुन दिनांक 15/02/2022 रोजी फरार झाला होता. त्यावरुन पोलीस ठाणे वजीराबाद गु र नं. 49/2022 कलम 302, भादविसह 4/25 भाहका. प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयातील फरार असलेल्या आरोपीतांना पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागूशाकडून अटक करण्यात आली आहे.
मागील खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेली आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी अश्या सूचना पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थागुशा, नांदेड यांनी स्थागुशा येथील अधिकारी व अमंलदार यांचे
पथक तयार केले. आणि आरोपीचा गुप्त शोध घेऊन दि.21/02/2022 रोजी पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर स्थागुशा नांदेड यांना सदर गुन्हयातील फरार असलेला आरोपी नामे जयमल ऊर्फ गग्णा हरबंससिंघ धालीवाल वय 21 वर्षे रा.नांदेड हा निजामबाद येथे असल्याची खात्रीशीर माहीती मिळाल्याने त्यांनी स्थागुशाचे अधिकारी व अमंलदार यांना त्या फरार आरोपीस पकडुन चौकशी करण्यासाठी रवाना केले.
स्थागुशाचे पथकानी तेलंगणा राज्यातील निजामबाद येथे जावुन दिनांक 22/02/2022 रोजी नमुद आरोपीस ताब्यात घेवुन गुन्हयाबाबत विचारपुस करता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केल्याने फरार आरोपीस पुढील तपासकामी पोलीस ठाणे वजीराबाद यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अपर 'पोलीस अधीक्षक निलेश मोरे, अपर पोलीस अधीक्षक,भोकर विजय कबाडे, 'पोलीस निरीक्षक स्थागूशा नांदेडचे 'व्दारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली, सपोनि पांडुरंग भारती, सपोउपनि/ जसवंतसिंह शाहु, गोविंद मुंडे , पोहेकॉ/ मारोती तेलंग , पोकॉ / तानाजी येळगे, मोतीराम पवार ,चालक/कलीम शेख यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.